घरदेश-विदेशNobel Peace Prize 2021 : मारिया रेसा आणि दिमित्रा मुरातोव्ह यांना 'शांततेचा...

Nobel Peace Prize 2021 : मारिया रेसा आणि दिमित्रा मुरातोव्ह यांना ‘शांततेचा नोबेल पुरस्कार’ जाहीर

Subscribe

नुकतीच नोबेल शांती पुरस्कार २०२१ ची घोषणा झाली आहे. यंदाचा ‘शांततेचा नोबेल पुरस्कार’ हा फिलिपिन्स देशातील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांना जाहीर झाला आहे. नोबेल प्राइजच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र, शांतता किंवा बंधुत्व ठिकवून ठेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. नॉर्वेयन नोबल समितीने या पुरस्कार विजेत्याच्या नावांची घोषणा केली आहे.

- Advertisement -

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा संघटनेला दरवर्षी हा पुरस्कार जाहीर केला जातो. यापूर्वी गुरुवारी ब्रिटनमधील लेखक अब्दुलरजाक गुरनाह यांना साहित्यासाठी नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

फिलिपिन्स देशात मारिया रेसा यांनी २०१२ मध्य़े रॅपलर नावाचे एक माध्यमसमूह स्थापन केले. मारिया रेसा या समूहाचे प्रमुख म्हणून कार्य पाहतात. या माध्यम समूहातून त्यांनी आपल्या पत्रकारितेदरम्यान निर्भीडपणे काम करत समाजाचे प्रश्न मांडले. त्यामुळे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी रेसा यांच्या नावाचा विचार करण्यात आला असं नोबेल कमिटीने सांगितले आहे.

- Advertisement -

तर दिमित्री मुरातोव्ह यांनीही रशियामधील बिकट परिस्थितीचा सामना करत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक अन्न सुरक्षा मोहिमेला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -