मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गचा राजीनामा? कंपनीकडून मात्र वृत्ताचे खंडन

आर्थिक मंदीमुळे अॅमेझॉन, ट्विटर, मेटा यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. मात्र आता याच क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. त्यानुसार, मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्गने राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

Big blow to Facebook; The company's crypto project was sold

आर्थिक मंदीमुळे अॅमेझॉन, ट्विटर, मेटा यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. मात्र आता याच क्षेत्रातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. त्यानुसार, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. या कर्मचारी कपातीमुळे मार्क यांनी माफी मागितली असून राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. परंतु, मेटा कंपनीने मार्क झुकरबर्ग हे सीईओ पदावरून पायउतार झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. (Mark Zuckerberg Resigning From Meta CEO)

मार्क झुकरबर्ग हे पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्क झुकेरबर्ग यांच्या राजीनाम्याचे वृत्त मेटा प्रवक्त्याने फेटाळले असले तरी कंपनीच्या प्रकल्पातील सततच्या अपयशानंतर मोठे बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मेटाचे संपर्क प्रमुख अँडी स्टोन यांनी राजीनाम्याचे वृत्त अफवा असल्याचे सांगून फेटाळून लावले. दरम्यान, द लीक नावाच्या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, मार्क झुकरबर्ग यांनी कंपनी सोडली आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी मेटाव्हर्स प्रकल्पावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण त्याचे परिणाम दिसत नसल्याचे अहवालात म्हटले आहे. शिवाय कंपनीचे नुकसानही होत आहे. मार्क झुकेरबर्ग यांच्या व्हीआर प्रोजेक्टलाही बाजारातून फारसा प्रतिसाद मिळत नाही आहे.


हेही वाचा – विमानातील प्रवाशांना आता विनाइंटरनेट पाहता येणार मोफत OTT कंटेंट