घरताज्या घडामोडीऑक्सिजन, रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांची किंवा RTPCRचे जास्त पैसे घेणाऱ्यांची माहिती द्या अन्...

ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांची किंवा RTPCRचे जास्त पैसे घेणाऱ्यांची माहिती द्या अन् मिळवा २५ हजार रुपये

Subscribe

देशातील कोरोनाच्या संकटात अनेक लोकं औषधं, ऑक्सिजन सारख्या गोष्टींचा काळाबाजार करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पंजाबच्या जालंधर प्रशासनाने एक नवी शक्कल लढवली आहे. काळाबाजार करणाऱ्या लोकांची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. जालंधरच्या डीसीच्या आदेशानुसार कोरोना टेस्टपासून ते उपचारापर्यंत गडबड करणाऱ्या लोकांची माहिती किंवा स्टिंग करणाऱ्याला २५ हजार रुपयांचे बक्षीस दिली जाईल. त्या आधारावर एफआयआर नोंदविला जाईल.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने असे सांगितले गेले आहे की, जर ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिवीरचा काळाबाजार, आरटीपीसीआर टेस्टची अधिक किंमत किंवा कोविड संदर्भात कोणतीही गडबडबाबत ठोस माहिती दिली गेली तर  त्याच्या आधारावर एफआयआर नोंदवून जिल्हा प्रशासनाकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

- Advertisement -

देशात आज (गुरुवार) ३.८० लाख कोरोनाबाधित आढळले. गेल्या आठवड्यापासून दररोज देशात ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. एक्टिव्ह रुग्णांची संख्या २९ लाखांवर पोहोचली आहे. यादरम्यान काही भागांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनसारखी आवश्यक गोष्टींचा काळाबाजार करत असल्याचा घटना घडत आहेत. दररोज काळ्याबाजार करणाऱ्या टोळ्यांना पकडले जात आहे.


हेही वाचा – होम आयसोलेटेड, सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी केंद्राची नवी गाईडलाईन जारी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -