त्याने २७ वर्षीय लहान मुलीशी लग्न केलं आणि पोलिसांनी त्याला पकडलं…!

एडीला जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याला धक्काच बसला.

भारतात जास्त अंतर असूनही लग्न झालेली अनेक उदाहरणे आहेत. पती पत्नीमध्ये जास्त अंतर म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते अभिनेता मिलींद सोमण आणि त्याची १८ वर्षाने लहान असणारी बायको अंकिता कुवर. हे दोघेही त्यांच्या वयातील अंतारमुळे चर्चेत आले होते. पण आत्ताच्या आधुनिक जगात अगदीच सामान्य मानलं जातं. अगदी सेलिब्रिटांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अशी अनेक उदाहरणे पहायला मिळताता जिथे लग्न झालेल्यांमध्ये जास्त अंतर असतं. मात्र अमेरिकेमधील एका दांपत्याला हे वयातील जास्त अंतर असणं चांगलंच महागात पडलं आहे. मीरर युकेने याविषयी एक खास वृत्त दिल आहे.

पती पत्नी एकत्र फिरत होते. त्या दोघांमधील वयाचे अंतर आणि पेहरावावर बघितल्यावर शंका आली की, त्या माणसाने एका लहान मुलीचं अपहरण केलं आहे. या प्रकाराबद्दल थेट कोणीतरी पोलिसांकडेच तक्रार केली.  २२ वर्षीय टोरी आणि तिचा ४९ वर्षीय पती एडी यांच्यासंदर्भात हा चमत्कारिक प्रकार घडला आहे. या दोघांमध्ये २७ वर्षांचे अंतर आहे.

तर असं घडलं की…

एडीच्या एका ओखळीच्या व्यक्तीने त्याला एका तरुण मुलीबरोबर गाडीमधून जाताना पाहिले. त्यामुळे एडीने एका तरुण मुलीचे अपहरण केल्याची शंका या व्यक्तीला आली. या व्यक्तीने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात कळवले. बाल्टीमोर पोलिसांनी तातडीने एडीच्या गाडीचा पाठलाग करुन त्याला पकडले. यावेळी एडी गाडी चालवत होता आणि त्याची पत्नी टोरी बाजूला बसली होती.

पोलिसांनी घेतलं ताब्यात

एडीला जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याने आपली पत्नी ही तिच्या वयापेक्षा जास्त तरुण वाटत असल्याने गैरसमज झाल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले.

“आमच्यासमोरचा ट्रक जाण्याची आम्ही वाट पाहत असतानाच पोलिसांच्या दोन गाड्या आल्या आणि त्यांनी एडीला खाली उतरण्यास सांगितलं. आम्ही या सर्वांमुळे गोंधळलो. ही व्यक्ती तुझी कोण लागते असं मला पोलिसांनी विचारल्यानंतर एडी माझा पती असल्याचे मी त्यांना सांगितलं. मात्र हा सगळा काय गोंधळ सुरु आहे हे आम्हाला समजत नव्हतं,” असं टोरी घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना म्हणाली. पण नंतर पोलिसांना हे समजताच त्यांनी आमची माफी मागितली.


हे ही वाचा – Corona: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फोल!, WHOने सांगितलं ‘असा’ झाला कोरोना विषाणू निर्माण