घरCORONA UPDATEलोक घरी राहिले तर, उपासमारीने मरतील - अर्थतज्ज्ञ मार्टिन वोल्फ

लोक घरी राहिले तर, उपासमारीने मरतील – अर्थतज्ज्ञ मार्टिन वोल्फ

Subscribe

देशातील अनेक उद्योगधंदे बंद पडतील. यावर सरकारने विचार करायला हवा आणि योग्य उपाय योजना आखायला हव्यात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन आहे. आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी सरकाने लोकांची मदत केली पाहिजे, असं मत अर्थशास्त्रज्ञ मार्टिन वोल्फ यांनी व्यक्त केलं आहे. ते एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची सुचना दिली. अर्थशास्त्राचे तज्ज्ञ मार्टिन वोल्फ म्हणाले, “जर लोक बाहेर जाऊन नोकरी करू शकत नाहीत तर त्यांच्यावर घरात राहून उपासमारीची वेळ येईल. त्यांच्या जीवनमानाचं समर्थन केलं पाहिजे. हे सरकारचं प्रथम प्राधान्य हवं. दुसरीकडे सरकारने कंपन्यांना आधार द्यायला हवा. सरकारने सर्व बँकांना कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे,” असं वोल्फ म्हणाले.


हेही वाचा – CoronaVirus: न्यूयॉर्कमधील दोन मांजरीच्या पिल्लांना कोरोनाचा संसर्ग

- Advertisement -

देशातील अनेक उद्योगधंदे बंद पडतील. यावर सरकारने विचार करायला हवा आणि योग्य उपाय योजना आखायला हव्यात. भारताने आरोग्य सेवांवर देखील लक्ष ठेवायला हवा, असं वोल्फ म्हणाले. आपल्याकडे असलेली सर्व वैद्यकीय संसाधने आपल्याला वापरावी लागतील. आम्हाला माहिती आहे की भारताकडे आरोग्य सेवा ही तुलनेने मर्यादित आहे म्हणून हे खूप मोठं आव्हान आहे,” असं मार्टिन वोल्फ म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -