घरताज्या घडामोडीगलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्यूटी कलेक्टर!

गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या डेप्यूटी कलेक्टर!

Subscribe

५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी यांनी तेलंगणा सरकारने डेप्युटी कलेक्टरच्या पदी नियुक्त केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी बुधवारी कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांची पत्नी संतोषी यांना डेप्युटी कलेक्टर नियुक्तीचे पत्र सोपवलं.

- Advertisement -

संतोषी यांच पोस्टिंग हैद्राबाद जवळील परिसरात होईल. असे निर्देश सीएम चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत. कर्नल संतोष बाबू यांची पत्नी संतोषी आपली ८ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांच्या मुलासह दिल्लीत राहतात. संतोषी यांची आई हैद्राबादला राहते. कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आल्यानंतर तेलंगणा सरकारने कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांना ५  कोटी रुपयांची सन्मान निधी देण्याची घोषणा केली होती.

१५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० जवान शहीद झाले होते. यावेळी कर्नल संतोष बाबू यांनाही वीरमरण आलं.

- Advertisement -

हे ही वाचा – विद्यार्थ्यांनो नापास झालात? नो वरी, सरकारने घेतलाय ‘हा’ महत्त्वाचा निर्णय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -