घरताज्या घडामोडीMiG-21 Aircraft Crashed: शहीद वैमानिक अभिनव चौधरी यांनी १ रुपया घेऊन केले...

MiG-21 Aircraft Crashed: शहीद वैमानिक अभिनव चौधरी यांनी १ रुपया घेऊन केले होते लग्न

Subscribe

पंजाब येथील मोगा जिल्हातील लंगियाना खुर्द गावात काल (गुरुवार) रात्री उशिरा भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान MIG-21 क्रॅश झाले. या दुर्घटनेमध्ये मेरठमधील गंगानगरचे रहिवाशी वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश वायुसेनेकडून कोर्टाला देण्यात आले आहेत. अभिनव चौधरी यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील बागपतमधील राहणारे आहे. त्यांनी २५ डिसेंबर २०१९ रोजी लग्न केले होते. कौतुकास्पद बाब म्हणजे अभिनव यांनी १ रुपया घेऊन लग्न केले होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा हुंडा घ्याचा नव्हता त्यामुळे त्यांनी होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबाकडून फक्त १ रुपया घेतला होता. अशाप्रकारे लग्न करून त्यांनी समाजात एक आदर्श ठेवला होता, तसेच त्यांनी एक सकारात्मक संदेश देखील दिला होता. त्यांनी उचलेल्या या पाऊलाचे खूप कौतुक झाले होते. पण त्याच्या निधनामुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

गंगासागर कॉलनीतील निवासस्थानी अभिनव यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांचे वडील सतेंद्र चौधरी यांनी मुलीच्या पक्षाकडून विधी म्हणून फक्त १ रुपया स्वीकारला. लग्नात हुंडा पद्धत नसावी. दोन कुटुंबाला जोडण्याचे हुंडा हे साधना नाही. या प्रथेवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे, असे सतेंद्र चौधरी यांचे म्हणणे होते.

- Advertisement -

अभिनव चौधरी लहानपणापासून अभ्यासात खूपच हुशार होते. शिक्षणाव्यतिरिक्त वेगवेगळ्या खेळ्यांमध्ये त्यांची आवड होती. मेरठमध्ये असताना ५वीपर्यंतचे शिक्षण त्यांचे ट्रान्सलेट अकॅडमीमध्ये झाले. त्यानंतरचे ६वी ते १२वीचे शिक्षण राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज देहरादूनमध्ये (RIMC Dehradun) झाले. आरआयएमसीमध्ये देशातील काही निवडक मुलांची निवड होते. परंतु पहिल्याच प्रयत्नात अभिनव यांची निवड झाली. त्यामुळे कुटुंबाला समजले की, आपला मुलगा उंच भरारीच्या दिशेने पुढे जात आहे. यावेळी निराश होण्याऐवजी वडील सतेंद्र चौधरीसह सगळ्यांनी त्यांना प्रोत्सहित केले आणि आरआयएमसी देहरादूनमध्ये त्यांच्या प्रवेश केला.

अभिनव चौधरी यांची पहिला पोस्टिंग झाली ‘येथे’

तेथे शिक्षण घेत घेत त्यांना सैनिकी जीवनाचा अवलंब करण्यास सुरुवात केली होती. येथून बाहेरपडल्यानंतर ते एनडीएमध्ये पोहोचले आणि एनडीएनंतर एअर फोर्स अकॅडमीचे प्रशिक्षण पूर्ण करून २०१४मध्ये हवाई दलात भरती झाले. पुण्यात एनडीएचे प्रशिक्षण आणि शिक्षणानंतर हैदराबादमध्ये एअर फोर्स अकॅडमीमध्ये अधिकारी बनण्यासाठीच प्रशिक्षण पूर्ण केले. अभिनव यांना पहिली पोस्टिंग पठाणकोट एअरबेसवर मिळाली होती. अभिनव यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनंदन यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांपैकी अभिनव चौधरी एक होते. अभिनंदन त्यांचे वरिष्ठ होते, परंतु एकत्र पोस्टिंगमध्ये राहिले आणि एकत्र काम त्यांनी केले होते.


हेही वाचा – MiG-21 Bison Aircraft: भारतीय वायूसेनेचे फायटर जेट पंजाबमध्ये क्रॅश; अपघातामध्ये पायलटचा दुर्दैवी मृत्यू


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -