घरदेश-विदेशबॉलिवूडची फेव्हरेट किडनॅपिंग व्हॅन बंद होणार!

बॉलिवूडची फेव्हरेट किडनॅपिंग व्हॅन बंद होणार!

Subscribe

गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत अपहरणाचे चित्रीकरण करण्यासाठी अपहरणकर्ते मारुतीच्या ओम्नी कारचा वापर करत. या ओम्नी कारचा इतका वापर होत असे, की लोक या कारला तिच्या खऱ्या नावापेक्षा किडनॅपिंग व्हॅन (अपहरण करण्यासाठी वापरली जाणारी गाडी) म्हणून ओळखतात. ९० च्या दशकात या गाडीचा चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला. त्यामुळे ९० च्या दशकात शाळेत जाणारी मुले ओम्नी कार दिसली तरी घाबरत होती. इतकी या कारची दहशत होती. परंतु आता मारुती सुझुकीने आपली सर्वाधिक खपलेल्या ओम्नी या कारची निर्मिती बंद करण्याचे ठरवले आहे. मारुती ८०० नंतर कंपनीची ही दुसरी कार होती. गेल्या ३४ वर्षांपासून ही कार लोकांच्या पसंतीस उतरत होती.

कारची दहशत

मारुती कंपनीने भारतात पहिली कार मारुती ८०० लाँच केल्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी ओम्नी ही कार लाँच केली होती. मारुतीच्या ८०० किंवा ओम्नी या दोन्ही कार्सना त्यावेळी मारुती व्हॅन म्हणून ओळखले जात होते. ही व्हॅन बहुउपयोगी असल्याने भारतीयांनी तिला चांगला प्रतिसाद दिला होता. गाडीत जास्त जागा आणि जास्त आसनक्षमता होतीच. तसेच इतर मोठ्या कंपन्यांच्या तुलनेने किंमत कमी होती. त्यामुळे ती लोकांना आवडली. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये ही कार तर फारच गाजली होती. गुन्हेगारी, अपहरणसारख्या चित्रपटातील प्रसंगांसाठी ही कार मोठया प्रमाणावर वापरली जात असल्याने व्हॅन लोकांच्या चांगली लक्षात राहिली.

- Advertisement -

हे वाचा – एटीएम मशीन बिघडवून पैसे काढणारा चोर सापडला

अद्यापही खप चांगला तरीह होणार बंद

मारुतीच्या या ओम्नीच्या दरमहा ७ हजार गाड्या विकल्या जातात. परंतु आता कंपनीने कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगला खप असूनही कंपनीला ही कार बंद करावी लागत आहे. त्यला कारणही मोठे आहे. भारत सरकारने सुरक्षेसंबधी लागू केलेल्या नियमांमध्ये ओम्नी कार बसत नाही. त्यामुळे या कारची विक्री पूर्णपणे बंद केली जाणार आहे. या कारचे इंजिन सुरूवातीला ८०० सीसी इतके होते. यानंतर कारमध्ये मोठे बदलही करण्यात आले होते. परंतु, मूळ डिझाईनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे कार आता बंद करावी लागणार आहे.

- Advertisement -

ही कार घेणार ओम्नीची जागा

ओम्नी कार बंद केल्यानंतर तिची जागा वॅगनआर ही 7 सीटर कार घेईल. ही कार नवीन स्विफ्ट आणि डिझायरच्या प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. शिवाय मारुतीची इको ही कारदेखील ओम्नीसारखीच आहे. त्यामुळे ओम्नीची कसर इको भरून काढेल असा विश्वास कंपनीला वाटतो. शिवाय इको कारमध्ये १.२ लीटरचे पेट्रोल इंजिनदेखील आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -