‘मारूती’च्या इलेक्ट्रिक कारचं लाँचिंग रद्द, ग्राहक अजून प्रतिक्षेतच!

२०२० मध्ये ही कार लाँच होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ही कार लाँच न करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

maruti wagonr electric car launch plans cancelled
'मारूती'च्या इलेक्ट्रिक कारचं लाँचिंग रद्द, ग्राहक अजून प्रतिक्षेतच!

देशातील मारूती कंपनी गेली अनेक वर्ष चांगली ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. भारताच्या ऑटेमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारूती सुझुकीने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची लोकप्रिय कार म्हणजेच Wagonrचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार होते. या कारची खूप चर्चा रंगली होती. २०२० मध्ये ही कार लाँच होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता ही कार लाँच न करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

कोरोनामुळे देशभरातील अनेक कंपन्यांना तोटा सहन करावा लागला होता. मारूतीने Wagonr इलेक्ट्रिक कारचे लाँचिंग कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता कंपनीने ही इलेक्ट्रिक कार लाँच न करण्याचा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबात वृत्त दिले होते. मारूती कंपनी तांत्रिक आणि व्यायसायिक आर्थिक समस्यांमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. मारूती कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता wagonr कारच्या चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

कोरोना महामारीमुळे २०२३ मध्ये लाँच होणाऱ्या अनेक नव्या कार ३ ते ६ महिने उशीरा लाँच करणार आहेत. भारतामध्ये इलेक्ट्रिक कारना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी टाटा नेक्सॉननेही इलेक्ट्रिक कारला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे हुंदाय कोना, आणि MG ZS EV नेही भारतात इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या आहेत. अनेक नव्या कंपन्या भारतात पदार्पण करत आहेत. आता मारूती, हुंदाय, टाटा मोटर्स या भारतातील प्रमुख कंपन्या भारतीय बाजारात नवीन मॉडेल्स आणत आहे.


हेही वाचा – अखेर जो बायडेन यांचा विजय, अमेरिकन संसदेने केले शिक्कामोर्तब