Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Mask Free Countries: 'हे' देश बनले कोरोनामुक्त, मास्क विना फिरण्यास नागरिकांना परवानगी

Mask Free Countries: ‘हे’ देश बनले कोरोनामुक्त, मास्क विना फिरण्यास नागरिकांना परवानगी

या देशांमध्ये कोरोना नियंत्रित, Mask Free बनले देश

Related Story

- Advertisement -

गेल्या वर्षभरापासून भारतात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. मात्र जगात असेही काही देश आहेत, ज्यांनी जीवघेण्या कोरोनावर मात केली आहे. हे देश स्वतःहून कोरोनामुक्त झाल्याचे अभिमानाने सांगत आहे. तसेच, आता या देशांमध्ये नागरिकांना मास्क लावणे आवश्यक नसून या काही देशात नागरिक रस्त्यावर मास्कविना फिरताना दिसताय तर त्यांना कोणताही दंड आकारला जात नाही. कोरोना विषाणूच्या जीवघेण्या प्रादुर्भावातून काही देशांना दिलासा मिळाला असून काही देशांनी स्वत: ला कोविडमुक्त घोषित केले आहे. तसेच आता नागरिकांना त्या देशात मास्क न घालण्याचे आवाहन देखील केले आहे. कोणते असे देश आहे, ज्यांनी स्वत:ला कोरोनामुक्त केले हे जाणून घ्या.

‘या’ देशांमध्ये मास्क घालणं आता अनिवार्य नाही

इस्त्राइल

इस्त्राइल हा देश स्वत: ला कोविडमुक्त घोषित करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. येथे सरकारने फेस मास्क लावण्याचा अनिवार्य नियमही काढून टाकला आहे. तसेच तेथील लोकसंख्येच्या ७० टक्के लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

भूतान

- Advertisement -

भूतानमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाद्वारे कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारा हा देश आहे आणि अवघ्या दोन आठवड्यांत प्रौढ जनतेच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे. महामारीच्या सुरूवातीपासून देशात केवळ एकच मृत्यू झाला आहे. भूतान भारत आणि चीनची सीमा असूनही, वेळेवर योग्य निर्बंध लागू केल्याने या देशात कोरोना फार काळ टिकला नाही.

न्यूझीलंड

न्यूझीलंड या देशाने कोरोना महामारीला चांगल्या प्रकारे हाताळण्याने सर्व देशांकडून कौतुक केले जात आहेत. या राष्ट्राने पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांचे आभार मानून केवळ २६ मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर सरकारच्या कृती आणि निर्णयांमुळे न्यूझीलंड आज मास्क फ्री देश बनला आहे.

चीन

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रसार सर्वप्रथमा चीनमधून झाला असला तरी आता हा देश कोरोनामुक्त झाला आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या लसीकरणामुळे हा देश आता मास्क फ्री देश बनला आहे. चीन जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांपैकी एक होता, परंतु सध्या तो पर्यटनासाठीही खुला झाला आहे. चीनमधील बहुतेक थीम पार्क, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आता पूर्णपणे उघडली आहेत.

अमेरिका

या देशात काही ठिकाणी, संपूर्ण लसीकरण करण्यात आल्याने तेथील लोकांना मास्क न घालण्याचा सल्ला दिला आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने एक मोठी घोषणा केली आहे की ‘ज्या लोकांना कोरोना विषाणूविरूद्ध पूर्णपणे लसी दिली गेली आहे, त्यांनी एकट्याने चालणे, धावणे किंवा दुचाकी चालवताना घराबाहेरील मास्त घालावे लागणार नाहीत.’


coronavirus : धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोना विषाणूने ४७ वेळा बदलले स्वरुप, तिसरी लाट ठरणार जीवघेणी

- Advertisement -