घरताज्या घडामोडीमास्क घाला! कारण कोरोनाची लागण होण्याचा धोका २२५ पट कमी होतो

मास्क घाला! कारण कोरोनाची लागण होण्याचा धोका २२५ पट कमी होतो

Subscribe

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगपेक्षा मास्क प्रभावशाली आहे. याबाबतची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, तीन मीटर दूर राहण्याच्या नियमाच्या तुलनेत तोंड झाकून ठेवण्यामुळे २२५ पटीने कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो, असे संशोधकर्त्यांना आढळले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंपेक्षा मास्क प्रभावशाली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कोरोना महामारीमुळे जगातील प्रत्येक देशांमध्ये मास्क घालणे बंधनकारक केले आहे.

अहवालात म्हटले आहे की, जर्मन आणि अमेरिकन तज्ज्ञांच्या एका टीम केलेल्या नवीन शोधातून असा निष्कर्ष निघाला आहे की, चेहरा झाकून ठेवल्यामुळे अधिक सुरक्षा मिळते. जर तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या समोर पाच मिनिटांपर्यंत उभे राहतात आणि तुमच्यापैकी कोणी ३ मीटरचे अंतर राखत असेल, पण मास्क लावत नसेल, तर त्याला कोरोना संसर्गाचा ९० टक्के धोका असतो. जर कोणी सर्जिकल मास्क घातले असले तर कोरोनाचा धोका होण्यास ३० मिनिटे लागेल. जरी तो चेहऱ्यावर फीट बसला नसेल तरीही. तसेच जे कोणी वैद्यकीय दर्जाचे एफएफपी२ मास्क घालतात आणि त्यांना वेगळे ठेवले जाते, तर त्यांना एका तासानंतर विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता फक्त ०.४ टक्के असते.

- Advertisement -

अध्ययन करणारे गोटिंगेन आणि कॉर्नेल महाविद्यालयाचे तज्ज्ञ म्हणाले की, त्यांच्या संशोधनामुळे शारीरिक अंतर कमी महत्त्वाचे ठरते. अहवालात म्हटले की, एका प्रमुख समीक्षानंतर आढळले आहे की, मास्कचा व्यापक वापर केल्याने संसर्गाचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.


हेही वाचा – Omicron variant : मिश्र डोस दिल्याने वाढतेय रोगप्रतिकारशक्ती ; ऑक्सफर्डचे नवे संशोधन


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -