घरताज्या घडामोडीकर्नाटकात मास्कसक्ती, महाराष्ट्र प्रशासनही अलर्ट मोडवर?

कर्नाटकात मास्कसक्ती, महाराष्ट्र प्रशासनही अलर्ट मोडवर?

Subscribe

चीनसह जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांच्या खबरदारीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिल्लीच्या विमानतळावरही दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण देशातील राज्य सरकार अलर्ट मोडवर आहेत. ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BF.7 चे भारतात चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान कर्नाटक सरकारनेही खबरदारी म्हणून नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मास्कसक्ती केली आहे. कर्नाटकातील सर्व बंद इमारतींमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने कोविड सुरक्षा प्रोटोकॉल जारी केला आहे. तसेच नागरिकांनाही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोविड-१९ चाचणी केली जाणार आहे. रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, प्लांट आणि जनरेटर तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये सिनेमागृह, शाळा आणि कॉलेजमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी अनेकजण पब, हॉटेल, बार आणि पर्यटनस्थळावर गर्दी करतात. त्यामुळे कर्नाटक सरकारनं पब, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मास्क अनिवार्य केला आहे.

- Advertisement -

राज्याचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी सांगितले की, चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झालेली वाढ पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचनांनुसार, सर्व बंद इमारतींमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच सरकार दररोज २ ते ४ हजार रुग्णांची कोविड चाचणी करणार आहे. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रशासनही अलर्ट मोडवर?

महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोरोना निर्बंधांबाबत या बैठीकमध्ये निर्णय घेण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत कोरोनाच्या पंचसूत्राबद्दल आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी याकरिता आवाहन केले होते.

लहान मुलं आणि ६० वर्षांवरील वृद्ध मंडळींनी मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा. गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्स ठेवावं. महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची २ टक्के थर्मल टेस्टींग करण्यात येणार आहे, असंही तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं. महापालिकेतील आरोग्य विभागाला टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट आणि व्हॅक्सिनेशन या चार प्रक्रियांबाबत सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा :

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -