घरट्रेंडिंगVideo : करोनामुळे हजारो माकडांचा रस्त्यावर धुमाकूळ!

Video : करोनामुळे हजारो माकडांचा रस्त्यावर धुमाकूळ!

Subscribe

करोना व्हायरसचा परिणाम आता हळूहळू सगळीकडे होताना दिसत आहे. करोना व्हायरसमुळे अनेक पर्यटन स्थळ ओस पडली आहेत. याचा परिणाम तिथल्या प्राणीमात्रांवर झाला आहे. थाडलंडमध्ये याचा प्रत्यय आला आहे. एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडीओत थायलंडच्या रस्त्यावर माकडं उरतल्याचं दिसत आहे. हे उदाहरण जरी थायलंडमधलं असलं तरी करोना व्हायरसचा परिणाम विविध देशातल्या पर्यटनावर झाला आहे.

काय आहे व्हीडिओत

थायलंडच्या रस्त्यावर ३० ते ४० माकडं धावताना दिसत आहे. रस्त्यावर कोणी खाऊंच पाकीट टाकलं तरी ते घेण्यासाठी सगळी माकडं धावताना दिसत आहे. कारण सध्या पर्यटन स्थळांकडे कोणी फिरकत नसल्यामुळे सध्या प्राण्याचे हाल होत आहेत. . द गार्डिअनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या संदर्भातला व्हिडीओ पाहिला तर हे लक्षात येते. सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे या ठिकाणी भेट द्यायला शेकडो पर्यटक येतात. मात्र सध्या रस्त्यांवर, हॉटेल्समध्ये शुकशुकाट आहे. देशातल्या अनेक नागरिकांनाही करोनच्या भीतीने देश सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं पसंत केलं आहे. त्यामुळे रस्ते, हॉटेल्स, पर्यटन स्थळं ओस पडली आहेत. या सगळ्यामुळे हजारो माकडं रस्त्यावर उतरली आहेत.

- Advertisement -

देशात करोना फैलाव

राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये ९, मुंबईत ३, ठाण्यात १ आणि नागपुरात १ रुग्ण आहे. अमेरिकेहून नागपुरमध्ये दाखल झालेल्या व्यक्तिची वैद्यकिय चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये करोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर १० लाख ५७ हजार लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात आले आहे. जगभरात करोना फोफावला असून ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -