विशाखापट्टणममधील शिपिंग कंपनीच्या गोदामाला भीषण आग; 7 जण गंभीर जखमी

विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका शिपिंग कंपनीच्या (shipping company) गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका शिपिंग कंपनीच्या (shipping company) गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली असून, आगीत 7 जण जखमी झाल्याचे समजते. या जखमींना जवळच्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशाखापट्टणमच्या न्यू पोर्ट पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामू यांच्या माहितीनुसार, श्रवण शिपिंग कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत 7 जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

विशाखापट्टणममधील पेडागंत्याडा येथून गंगावरम पोर्ट रोडजवळ श्रवण शिपिंग कंपनीचे गोदाम असल्याचे समजते. तसेच, या गोदामात केमिकलचा (chemical) प्रचंड साठा होता. त्यामुळे गोदामाला आग लागताच गोदामातील आगीने भीषण रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र केमिकल स्टोअरला लागलेली आग विझण्याचे नाव घेत नव्हती.

मागील काही दिवसांपासून देशभरात आग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच, देशाच्या विविध भागांत आग लागत असून या आगीत अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे.


हेही वाचा – अमेरिकेत तरुणाकडून अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू