बांग्लादेशात नुपूर शर्माविरोधात जोरदार निदर्शने, भारतावर बहिष्कार टाकण्याची मागणी

प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत भारतात निदर्शने सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी नमाज पठनानंतर हिंसाचार उसळला होता

boycott india chants as thousands protest in bangladesh against nupur sharmas prophet comments

प्रेषित मोहम्मद पैंगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांविरोधात भारतासह जगभरातून जोरदार निदर्शने केली जात आहेत. दरम्यान महाराष्ट्रासह दिल्ली, कोलकाता, युपीसह रांचीमध्ये शर्मा यांच्याविरोधात जनक्षोम उफाळून आला. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत गोळीबार केला. यामुळे हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान या आंदोलनाचे लोन आता बांग्लादेशात (bangladesh) पोहचले आहे. आज शुक्रवारी नमाज पठनानंतर हजारो बांग्लादेशी नागरिकांनी बांग्लादेशची राजधानी ढाका येथे भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली, यादरम्यान सर्व आंदोलकांनी 16 जून रोजी भारतीय दूतावासाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. (protest in bangladesh against nupur sharma)

ढाका शहरातील मुख्य बैतुल मुकर्रम मशिदीजवळ शुक्रवारी नमाज पठणानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी भारतीय उत्पादनांवर आणि भारतावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. जमियत उलेमा बांग्लादेश, खिलाफत मजलिस, इस्लाम ओक्याजोत आणि इतर मुस्लीम संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ढाका पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मशीद बैतुल मुकर्रम आणि पलटन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. (Massive protest in Bangladesh against Nupur Sharmas Prophet comments)

ढाका शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बांग्लादेश पोलिसांच्या माहितीनुसार, इस्लामिक मूव्हमेंट बांग्लादेशने आजच्या कार्यक्रमासाठी कोणताही परवानगी घेतली नाही. मात्र अशा निषेध मोर्चाच्या नावाखाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत.

नुपूर शर्मा विरोधात भारतातही निदर्शने सुरु

प्रेषित मोहम्मद पैंगंबर (Prophet muhammad) यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याबाबत नुपूर शर्माविरोधात भारतात निदर्शने सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गेल्या आठवड्यात शुक्रवारी नमाज पठनानंतर हिंसाचार उसळला होता, यानंतर आजही उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारच्या नमाज पठणानंतर मुस्लीम समुदायाकडून घोषणाबाजी करण्यात आली. इतकेच नाही तर प्रयागराजमध्ये दगडफेक, जाळफोळीच्या घटनाही घडल्या आहेत. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक आणि महाराष्ट्रात शुक्रवारच्या नमाजानंतर नुपूर शर्मा विरोधात आंदोलन करण्यात आले.


नुपूर शर्मा प्रकरण- महाराष्ट्र, दिल्ली,कोलकाता, युपीमध्ये राडा, गोळीबार,दगडफेकीत पोलीस जखमी