घरताज्या घडामोडीचंदीगड mms प्रकरणी मास्टर माइंड जवानाला अटक

चंदीगड mms प्रकरणी मास्टर माइंड जवानाला अटक

Subscribe

पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh University)अश्लील व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लष्कर जवान संजीव सिंह या आरोपीला अटक केली आहे. विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये अंघोळ करतानाचा मुलींचा व्हिडीओ बनवल्याचा आरोप एका विद्यार्थिनीवर करण्यात आला होता. तसेच याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली होती. परंतु ती ज्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करत होती, तो मुलगा तिला सगळं डिलीट करण्याची धमकी देत ​​होता. तो मुलगा म्हणजे मास्टर माईंड जवान संजीव सिंह आहे.

- Advertisement -

पंजाब पोलीस आरोपी संजीवला न्यायालयात हजर करू शकतात. तसेच त्याला कोठडी सुद्धा दिली जाऊ शकते.
विद्यापीठात २४ सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती, तर २५ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने सोमवारी विद्यापीठ सुरू होणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीच्या शिमल्यात राहणाऱ्या प्रियकराने तिचा व्हिडीओ या लष्करी जवान संजीव सिंहला पाठवला होता. यानंतर तो तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करून इतर मुलींचे व्हिडीओ बनवण्यास भाग पाडू लागला. त्यानंतर तरूणीने गर्ल्स हॉस्टेलमध्ये मुली अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

एसआयटीकडून चौकशी

या प्रकरणात आरोपीच्या मोबाईलमधून डझनभर व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. सर्व व्हिडीओ आरोपी विद्यार्थ्याचे असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी आता तरूणीचा लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे. पंजाबच्या डीजीपीकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


हेही वाचा : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग नजरकैदेत?, सुब्रमण्यम स्वामींच्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -