घरदेश-विदेशOnline ऑर्डर केलं सोनं! उघडून पाहिलं आणि निघालं...

Online ऑर्डर केलं सोनं! उघडून पाहिलं आणि निघालं…

Subscribe

जर तुम्ही इंटरनेटवर काहीतरी ऑर्डर केले असेल परंतु त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी वेगळंच मिळालं आहे, असं कधी घडलंय का?..

हल्ली कोणतीही वस्तू ऑनलाईन ऑर्डर करण्याचे वेड सर्वांनाच लागले आहे. जर तुम्ही इंटरनेटवर काहीतरी ऑर्डर केले असेल परंतु त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी वेगळंच मिळालं आहे, असं कधी घडलंय का?.. कित्येकदा असा प्रकार समोर आला आहे की, मोबाईल ऑर्डर केला आणि त्या बॉक्समध्ये दगड कंपनीने पाठवला. अशावेळी फसवणूक तर होतेच मात्र पदरी निराशा पडते हे मात्र वेगळं… अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा शहरातून समोर आली आहे. तिथे काही लोकांनी इंटरनेटवर ऑनलाईन सोन्याचे बिस्कीट ऑर्डर केले, मात्र जेव्हा लोकांनी घरी आलेला बॉक्स उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण ऑर्डर केलेल्या बॉक्समध्ये सोन्याच्या बिस्कीटांऐवजी कंपनीने पितळ पाठवल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांना तक्रार देण्यात आली. फसवणूकीची माहिती मिळताच पोलिस कारवाईत आले आणि त्यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानंतर शेरगड पोलिसांनी फसवणूकीचे काम करणार्‍या टोळीतील तीन सदस्यांना अटक केली आहे. या टोळय़ा OLX वर सोन्याच्या बनावट वस्तूंची विक्री करीत असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे.

- Advertisement -

टोळीचा केला पर्दाफाश 

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ८ लाख रुपये रोख, ३ आधार कार्ड, बनावट सोन्याचे बिस्किटं, ९ सिमकार्ड आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. ही घटना मथुरा जिल्ह्यातील शेरगडची आहे. बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या नावावर ही टोळी OLXवर लोकांना फसवत होती. ही टोळी बऱ्याच दिवसांपासून कार्यरत होती, त्यानंतर पोलिस या लोकांवर सतत नजर ठेवत होते. शेरगड पोलिसांनी एका माहितीच्या आधारे छापा टाकणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी टोळीतील तीन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी मथुरा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी OLX अॅपवर सोन्याची बनावट बिस्किटं अस्सल असल्याचे भासवून सामान्यांची फसवणूक करत होते. या फसवणूकीच्या कामात ते बनावट कागदपत्रांवर आधारित सिम खरेदी करून त्याचा वापर करत होते.  एसपी देहात श्रीचंद यांनी सांगितले की, अटक केलेले आरोपी बनावट सोन्याचे बिस्किटं विक्रीच्या नावाखाली OLX वर लोकांना फसवत होते. काही लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ८ लाख ६० हजार रोख, ३ आधार कार्ड, ९ सिम आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. तर लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.


देशभरात कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांचा शोध घेण्यास होणार Sero सर्वेक्षण!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -