ट्रेन अंगावरुन जाऊनही चिमुरडी सुखरुप; व्हिडिओ व्हायरल

मंगळवारी उत्तरप्रदेशच्या मथुरा रेल्वे स्टेशनवर एका वर्षाची चिमुरडी खेळता खेळता रेल्वे ट्रॅकवर पडली. या चिमुरडीच्या अंगावरुन ट्रेन गेली तरी या मुलीला काहीही खरचटले नाही.

train track baby girl video viral
ट्रेन अंगावरुन गेली तरी मुलगी सुखरुप

उत्तरप्रदेशच्या मथुरामधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. कृष्णाच्या जन्मभूमीवर एक चमत्कार झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही क्षण जीव भांड्याल पडला असेच वाटते. मथुरा रेल्वे स्टेशनवर एक चिमुरडी रेल्वे ट्रॅकवर पडली. दरम्यान चिमुरडीच्या अंगावरुन ट्रेन जाऊनही चिमुकली सुखरुप होती. जेव्हा ट्रेन मुलीच्या अंगावरुन जात होती त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या लोकांच्या जीवात जीव नव्हता. ट्रेन गेल्यानंतर चिमुकलीला उचलण्यात आले. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे ट्रेन अंगावरुन जाऊनही तिच्या अंगाला साधे खरचटले सुध्दा नाही. हा सर्व प्रकार प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या एका प्रवाशांने कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशी घडली घटना

मंगळवारी उत्तरप्रदेशच्या मथुरा रेल्वे स्टेशनवर एका वर्षाची चिमुरडी खेळता खेळता रेल्वे ट्रॅकवर पडली. दरम्यान रेल्वे स्टेशनवर ट्रेन येण्याची घोषणा करण्यात आली. चिमुरडीला ट्रकवरुन उचलण्यासाठी जाणार असता तेवढ्यात वेगाने रेल्वे आली आणि निघून गेली. ट्रेन जाईपर्यंत प्लॅटफॉर्मवर असलेल्या लोकं घाबरले होते. क्षणभर काय चालले हे त्यांना कळेना. धडधड करत ट्रेन निघून घेल्यानंतर सर्वांनी रेल्वे ट्रॅकवर पाहिले. चिमुकली रडत होती. एका तरुणाने ट्रॅकवर उतरुन चिमुरडीला उचलले आणि तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मुलीला सुखरुप पाहता सर्वांना आनंद झाला. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित सर्व लोकांना हरे कृष्णा हरे कृष्णा बोलले.

५० डब्याची ट्रेन अंगावरुन गेली

यापूर्वी सोमवारी आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमधून एक असाच व्हिडिओ समोर आला होता. इथे एक व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडत होता. दरम्यान ट्रे आली तेव्हा काय करायचे हे त्याला कळेना. त्याला वाटले की आता तो वाचणार नाही. त्यावेळी तो ट्रॅकच्या मध्ये झोपला. त्याच्या अंगावरुन ट्रेन गेली. ५० डब्ब्यांची ट्रेन त्याच्या अंगावरुन गेली. या घटनेमध्ये या व्यक्तीला देखील थोडेही खरचटले नाही. ट्रेन निघून गेल्यावर तो उठून बसला. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे ही घटना घडली.