घरदेश-विदेशराजधानी 'तापली' !

राजधानी ‘तापली’ !

Subscribe

नवी दिल्ली – उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून राजधानी दिल्लीत काल या ऋतूतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दिल्लीमध्ये काल ४४ अंश सेल्सियस इतके होते. ते आज ४५ वर पोहोचण्याची शक्यता दिल्ली वेधशाळेने वर्तवली आहे. काल राजस्थानच्या जैसलरमेलपेक्षाही जास्त दिल्ली तापली होती.
दिल्लीच्या पालम परिसराचा पारा ४६ अंश से. वर पोहोचला होता, तर जैसलमेरमध्ये ४३ अंश से. ची नोंद करण्यात आली होती. यापूर्वी २४ मे २०१३ रोजी सफदरजंग येथे ४६ अंश से. इतक्या तापमानाची नोंद आहे. महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत पावसाच्या सरी बरसल्या होत्या. २ मे रोजी अचानक पाऊस पडल्याने शहराचे वातावरणच बदलून गेले. मात्र, २० दिवसानंतर सर्वाधिक उष्णतेने राजधानी तळपत आहे.

तापमानाचा उच्चांक
शहर                  अंश सेल्सियस
हिसार                     ४४.३
कानपुर                   ४४.५
इलाहाबाद                ४६.५
श्रीगंगानगर               ४४.६

आरोग्य सांभाळा, काळजी घ्या
  • दिल्लीकरांनो आरोग्य सांभाळा, अशी घ्या काळजी
    १. सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावे. यामुळे डोकं आणि डोळ्यांतील उष्णता शमते.
    २. खमंग, कोरडे, शिळे, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसेच आमचूर, लोणचं, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ खाणे टाळावे.
    ३. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावे. या पदार्थांमुळे पचनशक्ती बिघडते.
    ४. कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, जिर्‍याचे सरबत, शहाळ्याचे पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदूळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचे रक्षण होण्यास मदत होते.
    ५. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप लागत असल्याने पुरेसे पाणी प्यावे.
    ६. या दिवसांत सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची चप्पल वापरु नयेत.
    ७. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावे. डोके आणि डोळ्यांचे उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा.
    ८. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. १०-१५ मिनिटांनंतरच पाणी प्यावे
    ९. या दिवसांत फ्रिज किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो, म्हणून साधे अथवा माठातील पाणी प्यावे
    १०. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणे आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात
Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -