घरदेश-विदेशMayawati On Bharat Ratna : 'भारतरत्न'वरुन मायावतींनी केंद्राला धरले धारेवर; म्हणाल्या...

Mayawati On Bharat Ratna : ‘भारतरत्न’वरुन मायावतींनी केंद्राला धरले धारेवर; म्हणाल्या…

Subscribe

केंद्र सरकारने यंदा देशातील पाच व्यक्तींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे घोषणा केली आहे. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन, आणि लालकृष्ण आडवाणी यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा 23 जानेवारी रोजी करण्यात आली. त्यानंतर लालकृष्ण आडवाणी आणि आज 9 फेब्रुवारी रोजी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव आणि डॉ. स्वामीनाथ यांना भारतरत्न सन्मान देण्याची घोषणा करण्यात आली. केंद्राने केलेल्या या घोषणाने बहुजन समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांना धारेवर धरले आहे. (Mayawati On Bharat Ratna Mayawati holds the Center on edge over Bharat Ratna Said not at all right)

केंद्र सरकारने यंदा देशातील पाच व्यक्तींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे घोषणा केली आहे. यामध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी.व्ही. नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन, आणि लालकृष्ण आडवाणी यांचा समावेश आहे.

- Advertisement -

यामधील कर्पूरी ठाकूर यांना स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक आणि राजकारणी म्हणून ओळखले जाते. ते बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन- नायक म्हणून ओळखले जात होते हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : Chitra Wagh On Thackeray : तत्कालीन सरकारची लक्तरेही आम्हाला…; चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर निशाणा

काय म्हणाल्या मायावती?

केंद्र सरकारकडून देशातील पाच व्यक्तांनी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचं जाहीर केलं. यावर भाष्य बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, सध्याच्या भाजप सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केलेल्या सर्व व्यक्तिमत्त्वांचे स्वागत आहे. परंतु या प्रकरणात विशेषतः दलित व्यक्तिमत्त्वांचा अनादर आणि दुर्लक्ष करणे अजिबात योग्य नाही. सरकारने याकडेही नक्कीच लक्ष द्यावे असा सल्ला बसपा प्रमुख मायावती यांना दिला आहे.

हेही वाचा : Eknath Shinde : कुठला डाव कधी टाकायचा, कोणाला पायचित करायचे…; शिंदेंचा रोख कोणाकडे

कर्पूरी ठाकूर न्हावी कुटुंबातील

दिवंगत कर्पूरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणात सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे नेते मानले जातात. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म एका सामान्य न्हावी कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधी राजकारण करून आपले राजकीय स्थान निर्माण केले. आणीबाणीच्या काळात सर्व प्रयत्न करूनही इंदिरा गांधींना त्यांना अटक करता आली नाही.

 

बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या

देशात यावर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. यावर बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आक्षेप घेत केंद्राला धारेवर धरलं. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर ट्वीट करत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी केली आहे.

कांशीराम यांनाही भारतरत्न द्या

बसपाच्या अध्यक्षा मायाती यांनी भारतरत्नावरुन केंद्राला धारेवर धरतानाच मायावती यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले की, प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने भारतरत्न या पदवीने सन्मानित केले. त्यानंतर दलित आणि उपेक्षितांचे कांशीराम यांनी त्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष कमी नाही. त्यांनाही भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -