Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश कदाचित आम्ही सरकारला अडचणीत आणलं; राहुल गांधींनी 'इंडिया वि. भारत' वादावर केंद्राची...

कदाचित आम्ही सरकारला अडचणीत आणलं; राहुल गांधींनी ‘इंडिया वि. भारत’ वादावर केंद्राची उडवली खिल्ली

Subscribe

नवी दिल्ली : इंडिया नाव बदलून भारत असे होणार असल्याची चर्चा सध्या देशात सुरू आहे. या चर्चेदरम्यान काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) ताशेरे ओढताना खिल्ली उडवली आहे. फ्रान्समधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आमच्या युतीला इंडिया नाव देऊन सरकारला एकप्रकारे अडचणीत आणले आहे. मोदी सरकार देशाचे नाव बदलू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण जी-20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरही ‘भारत’ असे लिहिलेले दिसले. आंतरराष्ट्रीय समारंभात भारत असे लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. (Maybe we put the government in trouble Rahul Gandhi India Vs Bharat on the debate Mocked the center)

हेही वाचा – सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; काय होती प्लॅनिंग?

- Advertisement -

राहुल गांधी यांनी काँग्रेस पार्टीच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, घटनेत दोन्ही नावांचा वापर करण्यात आला आहे. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे संविधानानुसार बरोबर आहेत. संविधानात लिहिलेली आहेत. इंडिया जो भारत आहे तो राज्यांचा संघ आहे. त्यामुळे मला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही. इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे मान्य आहेत. असे म्हटल्यावर राहुल गांधी काही क्षण शांत झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर ते म्हणतात की, पण मला वाटतं कदाचित आम्ही आमच्या युतीला ‘इंडिया’ असं नाव देऊन सरकारला अडचणीत आणलं आहे. त्यामुळेच हा सगळा वाद निर्माण झाला आहे. आता ते देशाचे नाव बदलणार आहेत, असा टोलाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही आमच्या युतीला दुसरे नाव देखील देऊ शकतो, पण मला वाटत नाही की यामुळे काही फरक पडला असता. कारण हे लोक विचित्र पद्धतीने काम करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या आघाडीशी संबंधित पक्षांच्या राज्यांचा आवाज पुढे यायला हवा. आजच्या काळात कोणाचाही आवाज दाबता येत नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -