घरताज्या घडामोडीपुढील सूचना मिळेपर्यंत McDonald's बंद; अनेक कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात

पुढील सूचना मिळेपर्यंत McDonald’s बंद; अनेक कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात

Subscribe

जगभारातील अनेक बड्या कंपन्यांना आर्थिक तुटवडा सहन करावा लागतो आहे. शिवाय, आर्थिक मंदीची चाहुलही लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी नोकर कपातीला सुरूवात केली आहे. अशातच आगामी काळात Fast Food Chain अशी ओळख असणाऱ्या McDonald चाही समावेश होणार आहे.

जगभारातील अनेक बड्या कंपन्यांना आर्थिक तुटवडा सहन करावा लागतो आहे. शिवाय, आर्थिक मंदीची चाहुलही लागली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी नोकर कपातीला सुरूवात केली आहे. अशातच आगामी काळात Fast Food Chain अशी ओळख असणाऱ्या McDonald चाही समावेश होणार आहे. कारण, या आठवड्यापासून McDonald त्यांची अमेरिकेतील कार्यालयं पुढील सुचना मिळेपर्यंत बंद करणार आहे. (McDonalds temporarily closes us office to announce layoffs)

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात कंपनीकडून कॉर्पोरेट विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जाऊ शकते. त्यांना यासंबंधीच्या सूचना देण्याच्या विचारात कंपनी आहे. त्याआधी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना सोमवार ते बुधवार यादरम्यान घरूनच काम करण्यासंबंधीचा Email करण्यात आला होता.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीसंदर्भातील माहिती व्हर्चुअली देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. असे असले तरीही Mcdonald’s मधून नेमके किती कर्मचारी त्यांची नोकरी गमावणार हा आकडा मात्र अद्यापही समोर आलेला नाही. शिवाय एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सर्व बैठका रद्द करण्याचे निर्देशही कंपनीकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, कंपनीकडून कॉर्पेरेट विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार असल्याचं म्हणत काही विभागांत कर्मचारी कपात केली जाऊ शकते. तसेच, काही विभागांमध्ये नव्याने नोकरभरती होऊ शकते याची कल्पना मॅकडॉनल्ड्सकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.

- Advertisement -

परदेशात आयटी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केलेली असतानाच याचे थेट परिणाम भारतीय नोकरदार वर्गावरही होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी भारतातून मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू आहेत. पण, त्यातून अनेकांनीच गेल्या काही महिन्यांमध्ये नोकऱ्या गमावल्या आहेत. परदेशात असणाऱ्या काही भारतीयांचा व्हिसा संपण्याच्या मार्गावर आहे.

नियमांनुसार H-1B व्हिसा धारक जेव्हा बेरोजगार होतात तेव्हा अमेरिकेतील नियमांनुसार ते पुढील 60 दिवसच इथं राहू शकतात. त्यामुळं अडचणींमध्ये या एका अटीचीही भर पडताना दिसत आहे.


हेही वाचा – एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन; कौशल्य चाचणी शब्द मर्यादा कमी करण्याची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -