घरदेश-विदेशएक चूक आणि जगभरातील 4 कोटी बालकांना गोवरचा धोका

एक चूक आणि जगभरातील 4 कोटी बालकांना गोवरचा धोका

Subscribe

गेली दोन वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर आता कुठे परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच गोवरच्या (Measles) संसर्गाने डोके वर काढल्याने जगभऱातील आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहे.

गेली दोन वर्ष कोरोनाचा सामना केल्यानंतर आता कुठे परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच गोवरच्या (Measles) संसर्गाने डोके वर काढल्याने जगभऱातील आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना लशीच्या संशोधनामागे संपू्र्ण जग लागल्याने गोवरच्या लसीकरणावर त्याचा परिणाम झाला. परिणामी ४ कोटी बालकांना गोवरचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने( who) दिला आहे.

सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. एकट्या मुंबईतच गोवरची रुग्णसंख्या २५० हून अधिक असून राज्यात आतापर्यंत १३ बालकांचा गोवरमध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकारही धास्तावले असून गोवरच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर दुसरीकडे एकट्या भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये ही गोवरचा संसर्ग झाल्याने बालके दगावत आहेत. यावर डब्ल्यू एच ओनेही चिंता व्यक्त केली असून कोरोनासारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्याच्या धावपळीत १८ देशातील ६ कोटी बालकांचे गोवरचे डोस चुकल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

- Advertisement -

गोवर जरी सर्वाधिक वेगाने पसरणारा संसर्ग असला तरी लसीकरणामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येते. असेही संघटनेने म्हटले आहे. गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी जगातील ९५ टक्के लोकसंख्येला लसीचे २ डोस देणे गरजेचे आहे. पण कोरोना काळातील परिस्थितीमुळे प्रत्यक्षात फक्त ८१ ट्कके बालकांना गोवरची पहीली लस मिळाल्याचे आणि ७१ टक्के बालकांना गोवरचे २ डोस मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सर्वात धक्कादायक म्हणजे जगातील ४ कोटी बालकांचे गोवर लसीकरण चुकले असून यातील २.५ कोटी बालकांना गोवरचा पहीलाही डोस मिळालेला नाही. तर १.५ कोटी बालकांना लसीचा दुसरा डोस अदयापपर्यंत मिळालेला नाही.

- Advertisement -

गोवरच्या या प्रादुर्भावाची सुरुवात याचवर्षी झाली नसून गेल्या वर्षी २०२१ मध्ये २२ देशात गोवरने कहर केला होता. गोवरच्या ९० लाख केसेसची नोंद झाली. यात १ लाख २८ हजार मृत्यू होते. या देशांमध्ये कोरोना काळात गोवरचे लसीकरण रखडले होते. पण २०२२ मध्ये देशात महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये गोवरचा उद्रेक झाला असून त्यावर यु्दधपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. गोवर लसीचा डोस देण्याचे वय नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंतही करण्यात आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -