घरदेश-विदेशवैद्यकीय चाचणीची वेळ रात्री 10 ची, अतिकच्या हत्येवर कपिल सिब्बल यांचे आठ...

वैद्यकीय चाचणीची वेळ रात्री 10 ची, अतिकच्या हत्येवर कपिल सिब्बल यांचे आठ प्रश्न

Subscribe

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गुंड अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची तीन जणांनी गोळीबार करत हत्या केली. या हत्याकांडावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्येष्ठ काॅंग्रेसचे नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी या हत्याकाडांवर आठ असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गुंड अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची तीन जणांनी गोळीबार करत हत्या केली. या हत्येनंतर तीन शूटर्सला युपी पोलिसांनी पकडले. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात असतानाच या दोघांची हत्या करण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात तिघेजण तिथे शिरले आणि त्यांनी पोलिसांच कडं असूनही या दोघांवर गोळ्या झाडल्या. आता या हत्याकांडावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्येष्ठ काॅंग्रेसचे नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी या हत्याकाडांवर आठ असे प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्याची उत्तर मिळाली नाहीत. ( Medical examination time 10 pm Kapil Sibal eight questions on Atiq Ahmed murder )

कपिल सिब्बल यांनी सोमवारी संध्याकाळी एक ट्वीट केले आहेत. अतिक आणि अशरफ, नष्ट करण्याची कला, आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की, रात्री 10 वाजता वैद्यकीय तपासणी करणार होते. पीडितांना चालत नेलं जात होतं. माध्यमं सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होती. मारेकरी एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांच्याकडे सात लाखांची शस्त्रं होती. हल्लेखोर आधीपासूनच प्रशिक्षित होते. तिन्ही मारेकऱ्यांनी हत्येनंतर आत्मसमर्पण केलं.

- Advertisement -

रात्री 10 ला मेडिकल चेकअप का?

  • पीडितांना (अतीक-अश्रफ) चालत नेलं जात होतं
  • माध्यमांना सहज त्यांच्यापर्यंत पोहचला आलं
  • मारेकरी एकमेकांबदद्ल अनभिज्ञ होते का
  • मारेकऱ्यांकडे 7 लाखांहून अधिक किंमतीचं शस्त्र होती का?
  • हल्लेखोर आधीपासूनच प्रशिक्षित होते
  • तिघांनी हत्येनंतर आत्मसमर्पण केलं.

( हेही वाचा: अजित पवारांच्या चर्चा आणि सुप्रीम कोर्टातील केसचा काहीही संबंध नाही- संजय शिरसाट )

यूपी पोलीस अतिक अहमद आणि अशरफ अहमद याची चौकशी करत होते. उमेश पाल खून प्रकरणात दोघांची चौकशी सुरु होती. अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांनी नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. उत्तर प्रदेशमधील या घटनेनंतर प्रयागराजमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं होतं. इंटरनेटवरदेखील बंदी घालण्यात आली होती.

- Advertisement -

आता या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली होती. याप्रकरणी काही पोलिसांवर कारवाई देखील करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -