घरट्रेंडिंगमेडिकल मास्क की फॅब्रिक मास्क? कोणतं मास्क आहे सुरक्षित, WHO कडून गाईडलाईन्स...

मेडिकल मास्क की फॅब्रिक मास्क? कोणतं मास्क आहे सुरक्षित, WHO कडून गाईडलाईन्स जारी

Subscribe

सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशा वेळी कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. अशातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सतत पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात धुणे हे दैनंदिन सवयींपैकी एक झाले आहे. मात्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणतं मास्क वापरणं योग्य आहे? मेडिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क हे दोन्ही कोरोनापासून संरक्षण करता का? यासंदर्भातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये त्यांनी कोणत्या व्यक्तीने कोणतं मास्क कसं वापरलं पाहिजे याची माहिती दिली आहे.

मेडिकल फेस्क मास्क की फॅब्रिक मास्क?

जागतिक आरोग्य संघटनेने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणतं मास्क वापरणं योग्य आहे.

- Advertisement -
  • आरोग्य कर्मचारी
  • ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आहेत
  • जे लोकं कोरोना रूग्णांची काळजी घेत आहेत

ज्या ठिकाणी कोरोनाचा व्यापक प्रसार झाला आहे. कमीत कमी एक मीटर अंतरावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं कठीण असेल अशा ठिकाणी मेडिकल मास्क वापरणं आवश्यक आहे. तर ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल, ज्यांना कोणता तरी आजार असेल अशां लोकांनी देखील मेडिकल मास्कचा वापर करावा.

फॅब्रिक मास्क

  • मास्कची कमतरता भासत असताना मेडिकल मास्कचा वापर पर्यायी मास्क म्हणून करण्यात येत आहे. डब्ल्यूएचओने असा सल्ला दिला की, ज्या लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही अशा व्यक्तींनी फॅब्रिक मास्क वापरावे. तर यामध्ये समाजसेवक, कॅशिअर यांच्याशी संपर्कात येणाऱ्या लोकांनी देखील समावेश आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी, गर्दी असणाऱ्या ठिकाणी, कार्यालयं, किरोना स्टोअर अशा वातावरणात फॅब्रिक मास्कचा वापर करणं आवश्यक आहे.

मेडिकल फेस्क मास्क

  • मेडिकल फेस्क मास्क हे एकदाच वापरता येते. हे मास्क वापरल्यानंतर त्याचे योग्य विघटन करणे गरजेचे आहे.
  • मेडिकल मास्कला सर्जिकल मास्क असे देखील म्हणता येते.
  • फॅब्रिक मास्क पुन्हा वापरण्यायोग्य असतो. फॅब्रिक मास्क प्रत्येक वापरानंतर कोमट पाण्याने धुणे आवश्यक आहे.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -