घरताज्या घडामोडीएका शेतकऱ्याच्या मुलाने तयार केली 'कोरोना'वर लस

एका शेतकऱ्याच्या मुलाने तयार केली ‘कोरोना’वर लस

Subscribe

१५ ऑगस्टपर्यंत तयार होणारी लस एका शेतकऱ्याच्या मुलांनी तयार केल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या या वाढत्या संकटात एक दिलासादायक बातमी समोर आली. भारतात कोरोना व्हायरसवर पहिली COVAXIN या नावाची लस आली आहे. मात्र, ही लस कधी लाँच होणार याची प्रतिक्षा होती. परंतु, तिही सर्वांनाची प्रतिक्षा अखेर संपली. कारण १५ ऑगस्ट रोजी ही लस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, ही लस काढणारी व्यक्ती एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

बायोटेक्नोलॉजीत गेले आणि इतिहास घडला

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार; तामिळनाडूच्या थिरुथानी येथे शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या डॉ. कृष्णा एला असे या मुलाचे नाव आहे. शिक्षणाचा गंध नसलेल्या सर्वसामान्य घरातून हा मुलगा शिकला. त्यांनी कृषी क्षेत्रातले शिक्षण घेतले आणि याच क्षेत्रात काहीतरी भरीव करायचे अस उद्दिष्ट होते. पण, पुढे ते बायोटेक्नोलॉजीत गेले आणि इतिहास घडत गेला.

- Advertisement -

आणि मग ते भारतात आले

सुरुवातीला त्यांनी शेती विषयात पदवी घेतली होती. नंतर कृषी पदवीधर होऊन घरची शेती करणे हेच त्यांच्या आयुष्याचे स्वप्न होते. पण पैशाच्या गरजेपोटी ते नोकरी करु लागले. बायर नावाच्या फार्मास्युटिकल्स कंपनीत ते नोकरी करू लागले. पुढे हंगर फेलोशिप मिळाली आणि पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा त्यांचा रस्ता मोकळा झाला. विस्कॉन्सिन मेडिसन विश्वविद्यालयात त्यांनी १९९५ साली पीएचडी घेतली. त्यानंतर अमेरिकेतच नोकरी करण्याचे त्यांनी ठरवले. मात्र, त्या दरम्यान, त्यांच्या आईने त्यांचे डोळे उघडले आणि म्हणाली, ‘बाळा जे काही करशील ते भारतात कर. त्याचा आपल्या देशालाही फायदा होईल’. या गोष्टीचा सारासार विचार करुन त्यांनी भारतात येण्याचे ठरवले आणि ते भारतात आले.

नंतर सुरवातीच्या काळात हिपॅटेटिसची लस १ डॉलर इतक्या कमी किंमतीत मार्केटमध्ये आणण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी कंपनीला १२ कोटी रुपयांची आवश्यकता होती. कंपनीसाठी इतका फंड गोळा करणे अशक्य होते. तेव्हा आयडीबीआय कंपनीने त्यांना कर्ज दिले. ही कर्जाची रक्कम फक्त दोन कोटी होती तरिही कृष्णांनी हार मानली नाही. चार वर्ष त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॅबमध्ये परिश्रम केले आणि १ डॉलर इतक्या कमी किंमतीत हिपेटॅटिसवर बाजारात लस आणली. तेव्हा १ डॉलर म्हणजे अशक्यप्राय किंमत होती. त्यामुळे ही लस खुद्द तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने प्रती डोस १० रुपयांच्या किंमतीवर ३५ मिलीयन डोसची विक्री जगभरातील गरिब देशांमध्ये केली होती. त्यामुळे COVAXIN नावाची लस तयार करण्यात भारत बायोटेक यशस्वी पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तज्ज्ञ म्हणतात, १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस येणं निव्वळ अशक्यच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -