घरदेश-विदेशराहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट

Subscribe

शरद पवारांनी ट्विटरद्वारे या भेटीची माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबत चांगली चर्चा झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी याबाबत राहुल गांधींशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी ट्विटवर सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्टवादीने यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आघाडीसाठी ४० जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब झाला असून उर्वरित आठ जागांसाठी मित्रपक्षांनी किती आणि कोणत्या जागा लढवायच्या यावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजतंय.

- Advertisement -

दिल्लीतील शरद पवारांच्या ६ जनपथ या निवासस्थानी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात भेट झाली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट नाही झाले. मात्र शरद पवारांनी ट्विटरद्वारे या भेटीची माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबत चांगली चर्चा झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी याबाबत राहुल गांधींशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी ट्विटवर सांगितले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -