नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आजपासून जी-20 शिखर परिषद सुरू होणार आहे. जी-20 शिखर परिषदेसाठी जगभरातील अनेक देशांचे प्रमुख हे भारतात दाखल झाले आहेत. या परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जो बायडन या दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. या द्विपक्षीय बैठकीत भारत आणि अमेरिका यांच्या सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या बैठकीसंदर्भात संयुक्त निवेदन देखली जारी करण्यात आले आहे.
भारत-अमेरिकेने जारी केलेल्या संयुक्त निवेटना म्हटले की, भारताच्या G-20 अध्यक्षपदाचे बायडन यांनी कौतुक केले. तसेच मोदी आणि बायडन यांनी G-20च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केले आहे आणि विश्वास व्यक्त केला की शिखर परिषदेचे परिणाम सामाजिक उद्दिष्टांच्या दिशेने पुढे जाण्यास मदत करतील. दोन्ही नेत्यांनी मुक्त, सर्वसमावेशक आणि लवचिक इंडो-पॅसिफिक क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी ‘क्वाड’ च्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला.
PHOTO | Joint statement of the US and India after the bilateral meeting between US President @JoeBiden and PM @narendramodi in Delhi. (n/1)#G20India2023 #G20SummitDelhi #G20Summit2023 pic.twitter.com/OPu02eJVDp
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2023
बायडन यांनी अमेकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्यासंदर्भात भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या पत्राचे स्वागत केले आहे. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा तयार करण्यावर भर देण्यात येणार असून भारतीय व्यवसाय आणि संशोधन वाढवण्यासाठी 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा – जिनपिंग, पुतीनसह आता स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांचीही जी-20 शिखर परिषदेला दांडी; कोरोनाचे कारण
2024 मध्ये भारताकडून आयोजित केल्या जाणाऱ्या क्वाड गटाच्या बैठकीसाठी जो बायडन यांचे स्वागत करण्यासाठी भारत उत्सुक आहे. 2024मध्ये जानेवारीमध्ये क्वाड सदस्य देशांची बैठक आयोजित करण्यात आली असून यात भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.