घर देश-विदेश भोपाळमध्ये होणारी सभा रद्द; 'या' कारणामुळे इंडिया आघाडी बॅकफूटवर

भोपाळमध्ये होणारी सभा रद्द; ‘या’ कारणामुळे इंडिया आघाडी बॅकफूटवर

Subscribe

मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्यासारखे अनेक काँग्रेस नेते निवडणुकीपूर्वी कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र, सनातन धर्माच्या वादानंतर पेच निर्माण झालेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची भोपाळमध्ये पहिली संयुक्त रॅली रद्द करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्यासारखे अनेक काँग्रेस नेते निवडणुकीपूर्वी कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र, सनातन धर्माच्या वादानंतर पेच निर्माण झालेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची भोपाळमध्ये पहिली संयुक्त रॅली रद्द करण्यात आली आहे. (Meeting in Bhopal cancelled India s lead on the back foot due to Sanatan Dharma comment by Udaynidhi Stalin )

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची दिल्लीत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी महत्त्वाची बैठक झाली होती. याच बैठकीत इंडिया आघाडीच्या रणनीतीला अंतिम स्वरुप देत भाजपविरोधात देशभरात जाहीर सभा घेण्याचा निर्णय झाला होता.

- Advertisement -

तसंच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी सभा होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते के.सी. वेणूगोपाल यांनी केली होती. मात्र, आता ही सभा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु ही सभा रद्द करण्यामागे नेमकं कारण काय ते अद्याप समोर आलेलं नाही. परंतु यावरून आता भाजने इंडिया आघाडीला लक्ष्य केलं आहे. सनातन धर्मावर टीका केल्यामुळे लोकांमध्ये रोष आहे आणि त्यामुळेच ही सभा रद्द केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली की, इंडिया आघाडीतील नेत्यांनी सनातन धर्मावरून जी वक्तव्ये केली होती, त्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे. त्याला घाबरूनच त्यांनी जाहीर सभा रद्द केली असावी. द्रमुकच्या नेत्यांनी सनातन धर्माला डेंग्यू, मलेरियाची उपमा दिली. त्याबद्दल जनतेच्या मनात रोष खदखदत आहे. सनातन धर्माचा अवमान मध्यप्रदेशची जनता कधीही सहन करणार नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केलेली वक्तव्यं हे आमच्या श्रद्धांना धक्का पोहचवणारे आहे, हे त्यांना कळलं पाहिजे, अशी टीका शिवराज चौहान यांनी केली आहे.

एमके स्टॅलिन यांचं वक्तव्य

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा आणि तामिळनाडूचा क्रीडा मंत्री उदयनिधी स्ट‌ॅलिन आणि द्रमुकचे नेते ए.राजा यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. सनातन धर्मामुळे समाजात विभाजन होत असून त्याचं निर्मूलन करायला हवं. ज्याप्रमाणे डेंग्यू, मलेरिया आणि करोना विषाणू आजार पसरवतात, त्याप्रमाणे सनातन धर्माने समाजासमाजात भेद निर्माण केले आहेत, असं विधान उदनयनिधी स्टॅलिन यांनी केलं आहे.

(हेही वाचा: PM Modi : अतिशय महत्त्वाची आहे विश्वकर्मा योजना, स्किल, ट्रेनिंगसह मिळणार तीन लाखांपर्यंत कर्ज )

- Advertisment -