घरताज्या घडामोडीElection Results 2022: पाच राज्यांतील निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची बैठक, काँग्रेस...

Election Results 2022: पाच राज्यांतील निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची बैठक, काँग्रेस नेतृत्व बदलाची शक्यता?

Subscribe

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपाने पाच पैकी चार राज्यांमध्ये मुसंडी मारली आहे. परंतु पंजाबची स्थिती पाहिली असता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या काँग्रेसला आपने गुंडाळलं आहे. काँग्रेसला शॉक लागल्यामुळे आता निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या G-23 नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस नेतृत्व बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या G-23 नेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि भूपिंदर सिंग हुडा यांचा समावेश होता. ही बैठक गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी पार पडली. परंतु या बैठकीत काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागल्याची चर्चा सांगितली जात आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महत्त्वाची बैठक बोलावली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहणारे G23 गटाचे नेते लवकरच संघटना आणि नेतृत्व बदलाची मागणी पुन्हा एकदा मांडली, अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आलं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सक्रिय अध्यक्ष आणि संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची मागणी केली होती.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर G-23 गटाच्या नेत्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव दुर्दैवी असल्याचे सांगून काँग्रेस लवकरच जनतेचा विश्वास जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच माझ्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक चढउतार पाहिले आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहणे दुर्दैवी होते, असे खर्गे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -


हेही वाचा : India corona update: देशातील कोरोना मृत्यूच्या संख्येत मोठी घट! 24 तासांत 3614 नव्या रुग्णांची वाढ, तर 89 जणांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -