हिंमत असेल तर ताजमहालचे मंदिर बनवून दाखवा; मेहबुबा मुफ्तींचे भाजपला आव्हान

लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना मुस्लिमांच्या मागे लावण्यात आले आहे. देशाचा पैसा लुटून परदेशात पळून गेलेल्यांना पकडण्याऐवजी मुघलांनी बांधलेल्या प्रत्येक जागेला विरोध करायचा आहे, असेही मुफ्ती यांनी म्हटले.

आग्रा येथील एेतिहासिक ताजमहालवरून वाद वाढत चालला आहे. आता या वादात जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही उडी घेतली आहे. तुमच्यात हिंमत असेल तर ताजमहाल, लाल किल्ल्याला मंदिर बनवून दाखवा, असे आव्हान मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप सरकार आणि हिंदू संघटनांना दिले आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर आरोप करत असे सर्व वाद केवळ लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच उभे केले जात असल्याचे म्हटले आहे.  लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना मुस्लिमांच्या मागे लावण्यात आले आहे. देशाचा पैसा लुटून परदेशात पळून गेलेल्यांना पकडण्याऐवजी मुघलांनी बांधलेल्या प्रत्येक जागेला विरोध करायचा आहे, असेही मुफ्ती यांनी म्हटले.

भारतीय जनता पक्षाचे नेते रजनीश यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दावा केला आहे की, ताजमहाल खरोखरच तेजोमहाल आहे. रजनीश यांनी ताजमहालच्या तळघरातील 22 खोल्या उघडण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता मेहबुबा मुफ्ती यांनी ताजमहल वाद किंवा मंदिर बांधून लाल किल्ला दाखवावा, असा इशारा दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, त्यांच्यात हिंमत असेल तर ताजमहाल, लाल किल्याला मंदिर म्हणून बनवून दाखवावा.  मग बघूया जगातील किती लोक हा देश बघायला येतील?  मुघलांच्या काळात ज्या वस्तू ताजमहाल, मशिदी, किल्ले बांधल्या गेल्या आहेत, त्या यांना खराब करायच्या आहेत. यातून काहीच मिळणार नाही. आपला देश आता गरिबीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे पडला असल्याचीही टीका त्यांनी केली.