मेहुल चोक्सी भारत मिशनवर IPS शारदा राऊत कोण आहेत ?

ips sharda raut

मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी भारतातील एक टीम सध्या डॉमनिकामध्ये आहे. या टीममध्ये CBI, ED आणि CRPF चे अधिकारीही समाविष्ट आहेत. एका प्रायव्हेट जेटच्या माध्यमातून डॉमनिकासाठी या टीमने प्रवास केला आहे. बॅंक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी भारताला हवा आहे. बॅंकिंग फ्रॉड प्रकरणे हाताळणाऱ्या सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत या महिला अधिकारी या टीमच्या एक महत्वपूर्ण सदस्या आहेत. यांच्या नेतृत्वातच पीएनबी बॅंक घोटाळ्यातील चौकशीला सुरूवात झाली होती. मेहुल चोक्सी हा २०१८ पासून एंटीगामध्ये राहत होता, त्याला डॉमनिकामध्ये अटक करण्यात आली आहे.

डॉमनिकामध्ये सध्या ८ जणांची टीम आहे. आहे. त्यामध्ये सीबीआय, ईडी आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. या टीमच्या महत्वपूर्ण सदस्या असलेल्या शारदा राऊत यांचीही तपासातील भूमिका महत्वाची अशी आहे. आयपीएस अधिकारी शारदा राऊत यांचा जन्म हा महाराष्ट्रातील नाशिकचा आहे. तर २००५ च्या बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची या विषयात काम करण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे. याआधीच्या पोस्टिंगमध्ये त्यांनी पालघरमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले होते. नागपुर, मिरा रोड, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केले आहे. अत्यंत प्रामाणिक आणि गुणवंत अशा अधिकाऱ्यापैकी एक शारदा राऊत यांना ओळखले जाते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार २८ मे रोजी ही टीम त्याठिकाणी पोहचली. त्यानंतर सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचीही मदत घेण्यात येणार आहे. ईडीची टीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्रही दाखल करणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये मेहूल चोक्सी हे भारतीय नागरिक असल्याचे मांडण्यात येणार आहे. भारत सरकारच्या मंजुरीनंतरच हा अहवाल कोर्टात मांडण्यात येणार असल्याचे कळते. एका प्रायव्हेट जेटने या टीमने भारतातून प्रवासाला सुरूवात केली होती. या संपुर्ण पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणात भारतात आणण्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मेहूल चोक्सीला भारतात आणल्यानंतरच दिल्ली विमानतळावर अटक होण्याची शक्यता आहे.