Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस मागे; पण अटकेची टांगती तलवार कायम

मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस मागे; पण अटकेची टांगती तलवार कायम

Subscribe

चोक्सीने फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारे चोक्सी याला रेड नोटीसमधून वगळण्यात आले आहे.

पंजाब नॅशनल बॅंकेच्या 13 हजार 50 कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मेहूल चोक्सी याला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसच्या यादीतून काढून टाकले आहे. चोक्सीने याबाबत फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारे चोक्सी याला रेड नोटीसमधून वगळण्यात आले आहे. परंतु, नोटीस रद्द झाल्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्यावरील दाखल गुन्ह्यांचा तपास  पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे मेहूल चोक्सीवर अटतेची टांगती तलवार कायम असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

जानेवारी 2018 मध्ये, मेहुल चोक्सी देशातून फरार झाल्याच्या सुमारे 10 महिन्यांनंतर, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. देश सोडल्यानंतर चोक्सीने अँटिग्वा आणि बरबुडा या देशांचे नागरिकत्व स्वीकारले होते. मेहूल चोक्सीविरोधात सीबीआयने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याच याचिकेला चोक्सीने आव्हान दिले होते. त्यानंतर आता चोक्सी याला रेड काॅर्नर नोटीसमधून वगळण्यात आले आहे.

सुनावणीनंतर रेड नोटीस रद्द 

- Advertisement -

चोक्सीने त्याच्याविरोधात सीबीआयने जारी केलेल्या रेड नोटीसला आव्हान दिले होते आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्राचा परिणाम असल्याचे म्हटले होते. चोक्सीने आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगाची स्थिती, वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारख्या समस्यांबाबतही त्याने प्रश्न उपस्थित केले. मिळालेल्या माहितीनुसार, चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या न्यायालयात गेले. या समितीला कमिशन फाॅर कंट्रोल फाईल्स म्हणतात. त्यानंतर आता समितीने सुनावणीनंतर चोक्सीच्या विरोधातील रेड नोटीस रद्द केली आहे.

( हेही वाचा: नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, कार्यालयात २ फोन )

चोक्सी आणि नीरव मोदीविरोधात स्वतंत्र आरोपपत्र दाखल

- Advertisement -

मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी या दोघांवर मुंबईतील पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या अधिका-यांच्या संगनमताने 14 हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 2011 ते 2018 या कालावधीत बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे विदेशी रक्कम खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. या प्रकरणात सीबीआयने दोघांवरही स्वतंत्र आरोपपत्र दाखल केली होती.

 

- Advertisment -