घरदेश-विदेशभारताल्या 'या' ८०० वर्ष जुन्या मंदिराच्या पायऱ्यांमधून ऐकू येतं सुमधूर संगीत

भारताल्या ‘या’ ८०० वर्ष जुन्या मंदिराच्या पायऱ्यांमधून ऐकू येतं सुमधूर संगीत

Subscribe

या मंदिराची सगळ्यात मोठ्ठी खासियत अशी आहे की, येथील पायऱ्यांमधून संगीताची धून ऐकू येते. त्यामुळे हे मंदिर खूप वेगळं आहे. या मंदिराचं केवळ धार्मिक महत्व नसून हे प्राचीन वास्तुकलेसाठी देखील प्रसिद्ध आहे

हिंदू धर्मात देवी-देवतांना अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते. प्रत्येक हिंदू महिना प्रत्येक देवाला समर्पित केला जातो. त्यामुळे संपूर्ण भारतात भगवान शंकरांची पूजा-आराधना केली जाते. श्रावणात अनेकजण भगवान शंकरांच्या विविध तिर्थ क्षेत्रांना भेट देतात. असचं एक रहस्यमय मंदिर तमिळनाडू येथील कुंभकोणम पासून काही अंतरावर दारासुरममध्ये स्थित आहे.

या रहस्यमय मंदिराचं नाव एरावतेश्वर मंदिरा असून या मंदिरात वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर ८०० वर्ष जुनं असून या मंदिराच्या पायऱ्यांवरून संगीत ऐकू येत असल्याचं म्हटलं जातं. हिंदू मान्यतेनुसार, या मंदिरामध्ये देवांचा राजा इंद्राचा सफेद हत्ती एरावतकडून भगवान शंकरांची पूजा केली होती.

- Advertisement -

मंदिराच्या पायऱ्यांमधून ऐकू येतं संगीत


या मंदिराची सगळ्यात मोठ्ठी खासियत अशी आहे की, येथील पायऱ्यांमधून संगीताची धून ऐकू येते. त्यामुळे हे मंदिर खूप वेगळं आहे. या मंदिराचं केवळ धार्मिक महत्व नसून हे प्राचीन वास्तुकलेसाठी देखील प्रसिद्ध आहे.

- Advertisement -

या मंदिराला द्रविड शैलीमध्ये तयार करण्यात आलं होतं. या मंदिराच्या मुख्य दाराजवळील एका दगडाची पायरी बनवलेली आहे. जिथून पावलोपवाली वेगवेगळा आवाज ऐकू येत असतो. या पायऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही संगीताचे सात सुर ऐकू शकता.


हेही वाचा :काशी विश्वनाथाच्या मंदिरापासून काही अंतरावर आहे ‘हे’ स्वंयभू ज्योतिर्लिंग

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -