घरताज्या घडामोडीCorona Positive : प्रियांका गांधींच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि स्टाफला कोरोनाची लागण

Corona Positive : प्रियांका गांधींच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि स्टाफला कोरोनाची लागण

Subscribe

राजधानीमध्ये ४ हजार रूग्णांची नोंद

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीसुद्दा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला आयसोलेशन केलं आहे. यांसंदर्भातील माहिती प्रियांका गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

प्रियांका गांधींची ट्विटरवरून माहिती

काल माझ्या कुटुंबातील एक सदस्य आणि स्टाफचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु माझा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला आयसोलेशन केलं आहे आणि काही दिवसानंतर पुन्हा एकदा चाचणी करण्यास सांगितली आहे.

- Advertisement -

दिल्लीत कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉनच्या संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. मागील २४ तासांत दिल्लीमध्ये कोरोनाचे ४ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आलेल्या ८४ टक्के रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.

- Advertisement -

राजधानीमध्ये ४ हजार रूग्णांची नोंद

दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे ३ हजार १९४ इतके रूग्ण आढळून आले होते. तर पॉझिटिव्हिटी रेट ४.५९ टक्के इतका होता. काल (सोमवार) राजधानीमध्ये ४ हजार रूग्णांची नोंद झाली होती. तर पॉझिटिव्हिटी रेट ६.५ टक्क्यांपेक्षा अधिक होता.

रात्रीची संचारबंदी लागू

दरम्यान, ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत असल्यामुळे दिल्लीतील शाळा, कॉलेज, जिम, चित्रपटगृह बंद करण्यात आले आहेत. तसेच रात्रीची संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे.


हेही वाचा : Kisan Railway : मध्य रेल्वे मार्गावर किसान रेल्वेच्या ९०० फेऱ्या पूर्ण, देशभरात ३.१० लाख टन शेतीमालाची वाहतूक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -