घरदेश-विदेशपत्नीला होता संशय म्हणून लढवली अनोखी शक्कल अन् पतीचा भांडाफोड

पत्नीला होता संशय म्हणून लढवली अनोखी शक्कल अन् पतीचा भांडाफोड

Subscribe

पतीच्या चारित्र्यावरील संशय दूर करण्यासाठी बनावट नावाने आयडी बनवून पतीशी चॅटिंग करू लागली.

मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनसुनावणी दरम्यान एक पीडित महिला आपल्यापेक्षा वयाने १९ वर्षे मोठ्या असलेल्या पतीची तक्रार घेऊन तिथे पोहोचली होती. लग्न झाल्या नंतर काहीच दिवसांत या पीडित महिलेचा पती विविध प्रकारची औषधे घेऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत होता. त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते आणि या सर्व गोष्टींना कंटाळून तिने पतीचे घर सोडले. साधारणतः मागील 3 वर्षांपासून ही पीडित महिला पतीपासून वेगळी राहत आहे, पण जेव्हा ती तिच्या पतीपासून वेगळी झाली, तेव्हा पतीने 12 वर्षांच्या मुलाला सुद्धा आपल्यासोबत घेतले. आजही तिचा पती विविध कारणांमुळे तिचा छळ करत आहे.

दरम्यान, महिलेला तिच्या पतीच्या चारित्र्यावर अनेक शंका होत्या. त्यामुळे तिने पतीच्या चारित्र्यावरील संशय दूर करण्यासाठी बनावट नावाने आयडी बनवून पतीशी चॅटिंग करू लागली. यावेळी पतीकडून अश्लील गोष्टी जाणून तिला धक्का बसला. अश्लील गोष्टी चॅट करण्यासोबतच अश्लील व्हिडीओ पाठवायचा त्यानंतर पीडितेच्या लक्षात आले की, तिच्या पतीचे इतर महिलांसोबतही असेच संबंध असू शकतात. या संपूर्ण प्रकरणी पीडितेने पोलीस जनसुनावणीत तक्रार दाखल केली आहे.

- Advertisement -

अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश हिंगणकर यांनी या संपूर्ण प्रकरणी पीडितेच्या तक्रारीची चौकशी करून आरोपी पतीवर कारवाई करण्यास सांगितले आहे. संदर्भांत पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती महाराष्ट्रातील नागपूर येथील विमानतळावर विमान वाहतूक विभागात कार्यरत आहे. त्याचसोबत आमचे लग्नसुद्धा घरच्यांच्या संमतीनेच झाले होते आणि लग्नादरम्यान कुटुंबीयांनी सर्व काही पाहूनच पीडित महिलेचे लग्न लावून दिले होते. त्यामुळे काही दिवस पीडितेला पतीकडून त्रास सहन करावा लागला. पण तिचा पती ज्याप्रकारे विविध प्रकारची औषधे खाऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता, याच पीडित महिलेला खूप त्रास सहन करावा लागत होता.

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
पतीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने त्याला सोडून दिले. त्यावेळी तिच्या पतीने त्यांच्या 12 वर्षाच्या मुलालाही आपल्यासोबत नेले. दरम्यान यासंपूर्ण प्रकरणी पीडित महिलेने घटस्फोटासाठी इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली.

- Advertisement -

हे ही वाचा – बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण; ११ आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -