घरदेश-विदेश...तो मेसेज ग्राह्य धरला जाऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयात याचिका

…तो मेसेज ग्राह्य धरला जाऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयात याचिका

Subscribe

 

नवी दिल्लीः मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेला व्हॉईस किंवा व्हिडिओ मेसेज मृत्यूपूर्वी जबाब म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो का?, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. ऑनर किलिंगचा तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व सीबीआयने करावा ही मागणी फेटाळण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

- Advertisement -

उमा पालिवाल यांनी ही याचिका केली आहे. २७ मे २०२२ रोजी उदयपूर येथील झल्लारा येथे हत्येची घटना घडली होती. या घटनेतील आरोपींवर पुरावे नष्ट करणे व कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. येथील एका तरुणीने आंतरजातीय विवाह केला होता. कुटुंबीयांचा विवाहाला विरोध होता. त्यामुळे ते आमची हत्या करु शकतात, अशी शक्यता तरुणीने वर्तवली होती. १० मे २०२२ रोजी कुटुंबीयांनी तरुणीला बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह तिच्या कार्यालयात सापडला. मृत्यूपूर्वी तरुणीने एक व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ त्या तरुणीने उमा पालिवाल यांना पाठवला होता. ती तरुणी विशाखा संघटनेत कार्यरत होती.

या प्रकरणात पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला नाही. केवळ तरुणीच्या आईला आरोपपत्रात आरोपी करण्यात आले आहे. तसेच तरुणीने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ उमा पालिवाल यांना पाठवण्यात आला होता. त्यामुळे तो व्हिडिओ मृत्यूपूर्वी जबाब म्हणून ग्राह्य धरावा, अशी मागणी याचिका करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा. या तपासावर न्यायालयाचे नियंत्रण रहावे, अशी मागणी राजस्थान उच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी विनंती पालिवाल यांनी याचिकेत केली आहे.
सोशल मीडियावर टाकलेला मेसेज पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ नये, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे पालिवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -