घरदेश-विदेशदिल्लीत अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

दिल्लीत अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Subscribe

दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटी घेतली आहे. आज, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारस पटेल यांनी गडकरींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. मात्र महाराष्ट्रामधील राजकीय सत्तासंघर्षावर चर्चा करण्यासाठी या दोन नेत्यांची भेट झाली नसल्याचे अहमद पटेल यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले अहमद पटेल 

मी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेतली. ही राजकीय बैठक नव्हती. महाराष्ट्रातील राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही, असे अहमद पटेल या भेटीनंतर म्हणाले. सोनिया गांधीचे निकटवर्तीय समजले जाणारे अहमद पटेल हे बुधवारी सकाळी गडकरींच्या भेटीला गेल्याने राज्यातील शिवसेनेची गणिते बिघडू शकतात, अशी नवी चर्चा सुरु झाली. पटेल हे सोनिया गांधीचे निकटवर्तीय असून ते सध्या काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. काँग्रेसचे अनेक निर्णय पटेल यांच्याच सल्ल्याने होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तिढा सोडवण्यासाठीच ही भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली. मात्र आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गडकरींची भेट घेतल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा –

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -