घरदेश-विदेशMeta AI: डीपफेकवर मेटाचा मोठा निर्णय; फेसबुक-ट्विटरवर AI-जनरेटेड फोटो वापरताना 'अशी' घ्या...

Meta AI: डीपफेकवर मेटाचा मोठा निर्णय; फेसबुक-ट्विटरवर AI-जनरेटेड फोटो वापरताना ‘अशी’ घ्या काळजी

Subscribe

मेटा आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एआय-जनरेटेड फोटोंना लेबल लावण्याच्या तयारीत आहे. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा थ्रेड्सवरदेखील जर कोणी एआय-जनरेटेड फोटो पोस्ट केला, तर त्यावर एआय जनरेटेड असं स्पष्टपणे लिहिलेलं दिसेल, यामुळे खरे आणि खोटे फोटो ओळखणं सोप जाणार आहे.

नवी दिल्ली: डीपफेक व्हिडीओच्या वादात आता मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटाने स्पष्ट केले की, आता वापरकर्त्यांना त्यांनी एआय किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये काही बदल केले आहेत की नाही हे घोषित करावे लागेल. (Meta AI Meta s big decision on deepfakes Be careful when using AI generated photos on Facebook Twitter)

सोशल मीडिया कंपनी मेटाने बुधवारी नवीन नियम जाहीर केला. ज्यामध्ये असे म्हटलंय की, जाहिरातदारांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सामाजिक समस्या, निवडणुकीच्या मुद्द्यांवर डिजिटल पद्धतीने तयार केलेली किंवा बदललेली फोटोरिअलिस्टिक छायाचित्रे किंवा व्हिडिओ हे AI- जनरेटेड आहेत हे सांगणं बंधनकारक असेल.

- Advertisement -

मेटा आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एआय-जनरेटेड फोटोंना लेबल लावण्याच्या तयारीत आहे. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा थ्रेड्सवरदेखील जर कोणी एआय-जनरेटेड फोटो पोस्ट केला, तर त्यावर एआय जनरेटेड असं स्पष्टपणे लिहिलेलं दिसेल, यामुळे खरे आणि खोटे फोटो ओळखणं सोप जाणार आहे.

मेटा स्वत:च्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टूलने तयार केलेल्या फोटोंबाबत ही पॉलिसी आधीपासूनच फॉलो करत आहे. मेटा एआय (Meta AI) वापरून तयार केलेले फोटो जर फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेअर केले, तर त्यावर इमॅजिन्ड विथ एआय (Imagined with AI) असं लिहिलेलं दिसून येतं. अर्थात, हे फीचर सध्या इतर एआय टूल्स वापरून तयार केलेल्या फोटोंवर लागू होत नाही.

- Advertisement -

मेटाचे ग्लोबल अफेअर्स प्रसिडेंट निक क्लेग म्हणाले की, इतर फोटोंबाबत आम्ही इंडस्ट्री पार्टनर्ससोबत चर्चा करत आहोत. एआय जनरेटेड कंटेंटमध्ये एक समान धागा असावा, ज्यामुळे त्यांना ओळखणं सोपं जाईल. यासाठी काही कॉमन स्टँडर्डस लागू करणं गरजेचं आहे आणि यासाठी आम्ही इंडस्ट्रीमधील इतर मुख्य कंपन्यांसोबत मिळून काम करत आहोत, असं ते म्हणाले.

मेटानं म्हटलंय की, हे फीचर सुरू करण्याची सगळ्यात मोठी अडचण इतर कंपन्या आहेत. गुगल, ओपन एआय, मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, मिडजर्नी, शटरस्टॉक अशा एआय टूल्स असणाऱ्या कंपन्यांनी आपल्या फोटोंमध्ये मेटाडेटा जोडणं गरजेचं आहे. यानंतरच फेसबुक, इन्स्टा आणि थ्रेड्सवर हे एआय-जनरेटेड फोटो डिटेक्स करणं शक्य होणार आहे.

ऑडिओ-व्हिडिओचं काय?

मेटाने म्हटलं आहे की, इतर अॅप्स वापरून तयार केलेले एआय- ऑडिओ किंवा एआय-व्हिडिओ डिटेक्ट करण्याचं फीचर अद्याप आपल्याकडे नाही. मात्र, मेटाने असं फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओ किंवा ऑडिओ एआय-जनरेटेड आहे का हे सांगता येणार आहे.

(हेही वाचा: Nagpur News : काटोलच्या शासकीय कार्यक्रमात राजकीय गोंधळ, फडणवीसांसमोर अनिल देशमुख संतापले )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -