Metaची घोषणा : आता फेसबुकचा लूक बदलणार, होमपेजवर न्यूज फीड ऑप्शन

ज्या टॅबवर युजर्स जास्त वेळ घालवतात ते पहिले दिसणार आहे. युजर्सना टॅब पिन करण्याचा ऑप्शन देखील मिळेल, जेणेकरून टॅबची पोझिशन बदलणार नाही

meta announced new news feed and home option for facebook app

जगभरात आज मोठ्या संख्येने युजर्स फेसबुकचा वापर करतात. अशात कंपनीने अॅपमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने न्यूज फीडमध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने गुरुवारी एक नवीन फीचर रिलीज केले. हे फिचर IOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवप उपलब्ध असेल. आता युजर्सला Home आणि Feeds नावाचे दोन टॅब मिळतील. अॅप ओपन करताच तुम्हाला होम स्क्रीन दिसेल.

या टॅबमध्ये युजर्सना रील, स्टोरीज आणि इतर पर्सनलाइज्ड कंटेंट पाहण्यास मिळेल. तर दुसऱ्या टॅबचे नाव Feed असेल, ज्यामध्ये युजर्सना मित्रांच्या पोस्ट, ग्रुप्स, फेसबुक पेज आणि फेव्हरेट्स कंटेंटची माहिती मिळेल. यामध्ये यूजर्सना कोणतेही सजेशन मिळणार नाही.

iOS आणि Android वर मिळणार अपडेट

दोन्ही टॅब iOS आणि Android वर्जनसाठी असतील. युजर्सना लवकरच नवीन शॉर्टकट दिसू लागतील. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, यावेळी कंटेंट चेंज सुरु राहिल.

ज्या टॅबवर युजर्स जास्त वेळ घालवतात ते पहिले दिसणार आहे. युजर्सना टॅब पिन करण्याचा ऑप्शन देखील मिळेल, जेणेकरून टॅबची पोझिशन बदलणार नाही.

नवीन अपडेट केव्हा येईल?

कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन अपडेट येत्या काही आठवड्यांमध्ये ग्लोबली रोलआऊट केले जाईल, या फिचरला जोडण्याचा अर्थ असा आहे की, मेटाला त्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक टिकटॉकसारखेच बनवायचे आहे.

टिकटॉकचे अल्गोरिदम युजर्सना त्यांच्या कंटेन्ट पाहण्याच्या पद्धतीनुसार दाखववला जातो, फेसबुकच्या नवीन सेटिंगमध्येही हा पर्याय उपलब्ध असेल. हे शॉर्टकट लवकरच युजर्सना दिसणार आहेत.

मेटा म्हणते की, FIDE डिस्कव्हर इंजिनप्रमाणे कार्य करेल. युजर्सना अद्याप होम टॅबमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या पोस्ट दिसतील. यासह युजर्सना रिकमेंडेशन देखील दिसतील. त्याच वेळी, युजर्सना फीड टॅबमध्ये जाहिराती देखील दिसतील. यामुळे दोन्ही टॅबमधील अनेक कंटेंट समान असू शकतात.


हेही वाचा : निरोगी व्यक्तींवर जीएसटी नाही मग व्हिलचेअरवर का? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल