घरदेश-विदेशमेटा कर्मचार्‍यांवर पुन्हा एकदा टांगती तलवार, आता १०,००० लोकांच्या नोकऱ्या धोक्यात

मेटा कर्मचार्‍यांवर पुन्हा एकदा टांगती तलवार, आता १०,००० लोकांच्या नोकऱ्या धोक्यात

Subscribe

चार महिन्यांपूर्वीच या कंपनीने जवळपास ११ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.

Meta Layoffs: फेसबुकच्या मूळ कंपनी मेटामध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची टांगती तलवार सुरू आहे. मेटा १०,००० कर्चमाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे आणि आपल्या कॉस्ट ५००० रिक्त पदांची भरती करणार नाही. मंगळवारी कंपनीकडून ही माहिती देण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वीच या कंपनीने जवळपास ११ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता.

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असलेल्या मेटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या १३ टक्के कामगारांना कामावरून काढून टाकलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा मेटा कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. कंपनीने पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये सांगितले होते की, ते अधिक कार्यक्षम होण्यासाठी असे पाऊल उचलत आहेत.

- Advertisement -

झुकरबर्ग पॅरेंटल लीव्हवर जाण्यापूर्वी प्लॅन तयार होईल
कॉस्ट कटिंगचा हा टप्पा पुढील आठवड्यात अंतिम केला जाऊ शकतो. या योजनेवर काम करणारे सीईओ मार्क झुकेरबर्ग तिसरे अपत्य जन्माला घालण्यासाठी पॅरेंटल लीव्हवर जाणार आहे. त्यापूर्वीच या कॉस्ट कटिंगची तयारी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

२०२३ हे वर्ष कार्यक्षमतेचे वर्ष असल्याचं झुकेरबर्गचं म्हणणं
लोकांनी सांगितले की मागच्या वेळचा लॉकडाऊन आश्चर्यकारक होता, परंतु यावेळच्या लॉकडाऊनचा अंदाज लोकांनी आधीच वर्तवला आहे. झुकेरबर्गने २०२३ हे मेटासाठी ‘कार्यक्षमतेचे वर्ष’ असल्याचं म्हटलं आहे.

कंपनीच्या मेनलो पार्क कार्यालयातील कामगारांनी सहकर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढत असून त्याचं मनोधैर्य कमी होत असल्याचं म्हटलं आहे. नोकरी गेली तर त्यांना या महिन्यात वाटप करण्यात येणारा बोनस मिळेल का? अशी चिंता काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -