Meta Shares Sink: फेसबुकला मोठा झटका ! शेअर्स अन् युझर्सच्या संख्येतही घट

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने कंपनीचे नाव बदलून मेटा ठेवले होते. त्यामुळे आता फेसबुकला मोठा झटका बसला आहे. कंपनीचे नाव बदलल्यामुळे युझर्सच्या संख्येत घट होण्यास सुरूवात झाली आहे. तसेच फेसबुकचे शेअर २० टक्क्यांनी घसरले आहेत. २०२१ वर्षाच्या चौथ्या महिन्यात जवळपास ५ लाखांची घट झाल्याचं सांगितलं जातंय. तसेच पहिल्यांदाच फेसबुकच्या युझर्सच्या संख्येत घट होत असून कंपनीला नुकसानीचा मोठा सामना करावा लागत आहे.

मेटा व्हॅल्यूमध्ये १५ लाख कोटींची घसरण

डिसेंबरच्या तिमाहीत मेटाने १०.३ अब्ज डॉलरची कमाई केली. याचदरम्यान कंपनीच्या विक्रीत २८.१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तसेच ३३.६७ अब्ज डॉलर्सपर्यंत ही विक्री पोहोचली आहे. गेल्या वर्षीची तुलनेत शेअर ३.८८ डॉलरने कमी होऊन ३.६७ डॉलर्स इतकं झालं आहे. काल (बुधवार) मेटाच्या व्हॅल्यूमध्ये सुमारे २०० अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. त्यामुळे मेटाचा स्टॉक २२.९ टक्क्यांनी घसरून २४९ डॉलर्सवर येऊन ठेपला आहे.

युझर्सच्या संख्येत मोठी घट

२००४ साली फेसबुकची सुरूवात झाली. आर्थिक कारणांमुळे फेसबुकची कामगिरी निराशाजनक ठरली. एक तिमाहीपूर्वी फेसबुकच्या युझर्सची संख्या १.९३० अब्ज इतकी होती. परंतु आताची संख्या पाहिली असता ती १.९२९ अब्जावर पोहोचली आहे. याशिवाय व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने फेसबुकला टक्कर दिली आहे. त्यामुळे झुकरबर्गला आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण जगभरातून सध्या उत्तर अमेरिकेच्या युझर्सच्या संख्येत घट होताना दिसत आहे.


हेही वाचा  : BMC Budget 2022 : मुंबईची तुंबई करणाऱ्या कारभार्‍यांचा आयुक्तांनी जयजयकार केला, अर्थसंकल्पावर शेलारांची खोचक टीका