घरदेश-विदेशईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Subscribe

नवी दिल्ली – देशातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने अरुणाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती 26 सप्टेंबरला ट्विट करून दिली. यासोबतच की 25 ते 27 सप्टेंबरपर्यंत आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील मैदानी भागात कमी पाऊस होऊ शकतो. तर उप-हिमालयीन पश्चिम बंगाल-सिक्कीममध्ये 25 ते 28 सप्टेंबरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

दुसरीकडे, 27 सप्टेंबर रोजी ओडिशामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या भागातून परतण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. 24 तासांनंतर, नैऋत्य राजस्थानवर ‘अँटी-सायक्लोन’ प्रणाली तयार होईल आणि राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीवर वायव्य वारे सुरू होतील, ज्यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, “यानंतर येत्या दोन-तीन दिवसांत मान्सूनच्या पुनरागमनासाठी परिस्थिती अधिक अनुकूल होईल. ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दिल्लीतून मान्सून माघारी परतण्याची अपेक्षा आहे. दिल्लीत 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या संततधार पावसामुळे राजधानीला दीड महिन्यांतील अतिवृष्टीची तूट भरून काढली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -