घरदेश-विदेश#MeToo : सुहेल सेठ यांना मोठा दणका

#MeToo : सुहेल सेठ यांना मोठा दणका

Subscribe

लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप झालेल्या सेलिब्रिटी कन्सलटंट सुहेल सेठ यांच्यासोबत कोणताही करार करणार नाही असा निर्णय टाटा सन्स घेतला आहे. सुहेल सेठ यांच्यावर अनेक महिलांनी #MeToo अंतर्गत आरोप केले आहेत.

#MeToo अंतर्गत लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप झाल्यानंतर सेलिब्रिटी कन्सलटंट सुहले सेठ यांना मोठ दणका बसला आहे. लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप झाल्यामुळं सुहेल सेठ यांच्या सोबतचा करार टाटा सन्सनं रद्द केला आहे. सुहेल सेठ यांच्यावर अनेक मुलींनी लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप केले. त्यानंतर टाटा सन्सनं हा निर्णय जाहीर केला आहे. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सुहेल सेठ यांच्यासोबतचा करार संपत आहे. त्यानंतर टाटा सन्स सुहेल सेठ यांच्यासोबत कोणताही करार करणार नसल्याचं टाटा सन्स स्पष्ट केलं आहे. सेठ यांच्यावर महिलांनी केलेल्या आरोपांमध्ये साम्य आहे. सुहेल सेठ यांच्यावर चित्रपट निर्माती नताशा राठोड, पत्रकार मंदाकिनी गेहलोत आणि डीएन्ड्रा सॉअर्स यांनी लैंगिक गैरवर्तवणूकीचे आरोप केले आहेत. त्या फटका हा सुहेल सेठ यांना बसला आहे. ५५ वर्षीय सुहेस सेठ यांनी टाटा सन्समध्ये झालेल्या वादानंतर कंपनीची प्रतिमा पुन्हा एकदा उभी करण्यासाठी आणि विश्वासार्हता निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुहेल सेठ टाटा सन्स व्यतिरिक्त कोका कोला, जेट एअरवेज आणि दिल्ली सरकारसोबत देखील काम करत आहेत. पण, या कंपन्यांनी किंवा दिल्ली सरकारनं कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

वाचा – #MeToo: मला हे धक्कादायक वाटत नाही; हेमा मालिनी

#MeTooचं वादळ

देशात सध्या #MeTooचं वादळ जोरात आहे. अनेक दिग्गजांवर सध्या #MeToo अंतर्गत लैंगिक शोषणाचे झाले. नाना पाटेकर, अलोक नाथ, चेतन भगत, साजिद खान,कैलाश खैर,अनु मलिक,विकास बहल सारख्या दिग्गजांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. अनेक महिला समोर येऊन आता #MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोलत आहेत. दरम्यान, केवळ एकच बाजू ऐकून निर्णय घेऊ नका अशी मतं देखील आता समोर येत आहे. #MeTooचं प्रकरण आता न्यायालयात देखील पोहोचलं आहे.

वाचा – कैलाश खेरला बसली #MeToo ची झळ

वाचा – नागपूरमध्ये #MeTooचे बुमरँग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -