घरताज्या घडामोडीमेक्सिकोमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जणांचा मृत्यू

मेक्सिकोमध्ये अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जणांचा मृत्यू

Subscribe

अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोमध्ये अज्ञाकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत मेक्सिको सिटीच्या महापौरांचाही मृत्यू झाला आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाल्याचेही समजते. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल हल्लेखोरांना गोळीबार करूनच प्रत्युत्तर दिलं. (Mexico Mass Shooting 18 Dead Including Mayor)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मेक्सिकोच्या सॅन मिगुएल टोटोलापन येथील सिटी हॉल आणि जवळच्या घरावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये अज्ञात हल्लेखोर गोळीबार करताना दिसत आहेत. शिवाय, सिटी हॉलच्या भिंतींवर शेकडो गोळ्या दिसत आहेत. हॉलच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किमान 10 लोकांचे मृतदेह एकमेकांच्या जवळ पडलेले दिसले. मृतांच्या संख्येबद्दल परस्परविरोधी अहवाल आले होते, परंतु राज्य ऍटर्नी जनरलच्या कार्यालयाने पुष्टी केली असून, 18 जण मृत आढळली आहेत. मृतांमध्ये महापौर कोनराडो मेंडोझा, त्यांचे वडील आणि माजी महापौर जुआन मेंडोझा आणि इतर शहर पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले मात्र हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यामुळे हल्लेखोरांच्या शोधासाठी प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी लावल्याचे समजते. परंतू अद्याप एकही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

लॉस टेकलेरोस या गुन्हेगारी गटाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बुधवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, जरी स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्वरित पुष्टी झाली नाही. पीआरडी राजकीय पक्ष, ज्याचा कोनराडो मेंडोझा होता, त्याने हल्ल्यानंतर लगेचच मेयरच्या मृत्यूची पुष्टी केली. पक्ष या हल्ल्याचा निषेध करतो, न्यायाची मागणी करतो आणि हिंसा आणि दण्डमुक्तीची मागणी करतो, असे निवेदनात म्हटले आहे.


हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -