घरताज्या घडामोडीMushtaq Ahmed Zargar: मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Mushtaq Ahmed Zargar: मुश्ताक अहमद जरगर दहशतवादी घोषित; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Subscribe

केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs/MHA) अल-उमर मुजाहिदीनचा संस्थापक (AlUmar-Mujahideen founder) आणि मुख्य कमांडर मुश्ताक अहमद जरगरला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ अंतर्गत जरगरला दहशतवादी घोषित केले गेले आहे. काही दिवसांपासून गृहमंत्रालयाने कुख्यात दहशतवादी सरगना हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदलाही दहशतवादी म्हणून घोषित केले होते. दरम्यान मुश्ताक अहमद जरगरला लटरम देखील म्हटले जाते, सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या (पीओके) मुजफ्फराबादमध्ये आहे.

कोणत्या आधारावर दहशतवादी म्हणून केले घोषित

गृहमंत्रालयाने म्हटले की, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्यासाठी पाकिस्तानकडून मुश्ताक अहमद जरगर मोहीमा चालवत होता. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दहशतवादी हल्ल्याची योजना बनवण्यात आणि हल्ला करण्यात, तसेच दहशवाद्यांचा निधीसह दहशतवादी गुन्ह्यात जरगरची प्रमुख भूमिका होती. याचं आधारावर जरगरला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. भारताने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरब, UAE, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियासाख्या बऱ्याच देशांसोबत दहशतवाद्यासंबंधित माहितीची देवाणघेवाण आणि कारवाया करण्यासाठी करार केला आहे.

- Advertisement -

यामुळे जरगरची सरकारने केली सुटका

अल-उमर मुजाहिदीनचा संस्थापक मुश्ताक अहमद जरगरने 12 ऑगस्ट 1989ने भारताचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद यांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात जरगरने 5 दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती आणि ती मागणी सरकारने मान्यही केली होती. जरगरला 1999च्या इंडियन एअरलाईन्स (Indian Airlines) विमान हायजॅक प्रकरणातून सोडून दिले होते. 24 डिसेंबर 1999ला काठमांडूहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या इंडियन एअरलाईन्स विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केले होते. या विमानाची लॅडिंग अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये केले होते. त्यावेळेस अफगाणिस्तानमध्ये तालिबान प्रशासन होते. प्रवाशांच्या सुखरुप सुटकेसाठी भारत सरकारने जरगरची मागणी मान्य करून मसूद अजहर, अहमद ओमर सईद शेखसारख्या दहशतवाद्यांना सोडून दिले होते.

१९९१मध्ये जरगरने स्वतःची दहशतावादी संघटना बनवली

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, 1991मध्ये जरगरने आपली स्वतःची दहशतवादी संघटना बनवली, ज्याचे नाव त्याने अलवर मुजाहिदीन ठेवले. त्यानंतर जरगरने जम्मू काश्मीरमध्ये हत्या केल्या, ज्यात काही उच्चपदस्थ आधिकाऱ्यांचा समावेश होता. 15 मे 1992ला त्याला अटक केली होती, तोपर्यंत त्याच्यावर ३ डझनहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु 1999मध्ये कंधार विमान हायजॅक प्रकरणात त्याला सोडण्यात आले. असे म्हटले जाते की, त्याला बालाकोट हल्ल्यात मारले आहे, परंतु याची अधिकृत माहिती नाहीये.

- Advertisement -

मुश्ताक जरगरवर जैश-ए-मोहम्मदच्या सरगना मौलाना मसूद अजहरसोबत मिळून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर अनेक हल्ले केल्याचा आरोप आहे. जरगर जैश-ए-मोहम्मदच्या मदरसामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षणही देतो. आजपर्यंत जरगरच्या संघटनेने आणि जैश-ए-मोहम्मदच्या संघटनेने शेकडो जवान मारले आहे.


हेही वाचा – Hate Speech Case in Sitapur: मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंताला बेड्या; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -