घरताज्या घडामोडीMHA Guidelines: कोरोनाचा कहर! गृहमंत्रालयाने जारी केल्या नवीन गाईडलाईन

MHA Guidelines: कोरोनाचा कहर! गृहमंत्रालयाने जारी केल्या नवीन गाईडलाईन

Subscribe

देशातील अनेक राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने एप्रिल महिन्यासाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनमध्ये टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसुत्रीवर काम करण्यासाठी अधिक जोर दिला आहे. शिवाय लसीकरण मोहीम अधिक लक्ष्य देण्यासाठी सांगितले गेले आहे. ज्या राज्यांमध्ये आरपीसीआर टेस्ट करण्याचा आकडा कमी आहे, तिथे टेस्ट वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

गाईडलाईनमध्ये सांगितले आहे की, ‘जर नवीन कोरोना रुग्ण आढळला तर त्याच वेळेस त्याच्यावर उपचार करून त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून सर्व संपर्कात येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करा. कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हा कलेक्टर वेबसाईटवर अपलोड करा आणि ही यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला शेअर करा.’

या नव्या गाईडलाईनमध्ये मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी योग्य दंड आकारण्याबाबत देखील सांगितले आहे. तसेच आंतरराज्य आणि राज्यांर्गत येण्या-जाणाऱ्यावर निर्बंध घालू नये. ज्या राज्यांमध्ये लसीकरण धीम्या गती होत आहे, त्याबाबत गाईडलाईनमध्ये चिंता व्यक्त केली गेली आहे. राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सांगितले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात २४ तासांत आढळले नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८१ टक्के रुग्ण या सहा राज्यातील आहेत. मागील २४ तासांत देशात ४० हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २९ हजार ७८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -