घरताज्या घडामोडीCET 2020: B.Tech, B.Pharmaची फायनल मेरिट लिस्ट लवकरच होणार जाहीर; अशी पहा...

CET 2020: B.Tech, B.Pharmaची फायनल मेरिट लिस्ट लवकरच होणार जाहीर; अशी पहा यादी

Subscribe

महाराष्ट्र सीईटी सेल कडून MHT CET 2020 Provisional Merit फायनल लिस्ट लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सीईटी सेल कडून MHT CET 2020 Provisional Merit फायनल लिस्ट लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये बी टेक, बी फार्मा या कोर्सचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रोव्हिजनल फायनल मेरीट लिस्ट आता सीईटी सेलच्या mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी ऑनलाईन देखील लिस्ट पाहू शकतील.

अशी पहा फायनल मेरीट लिस्ट

  • सर्वप्रथम महाराष्ट्र सीईटी सेलच्या mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर होम पेज वर बी ई किंवा बी टेकच्या किंवा तुमच्या कोर्सनुसार लिंक दिसतील.
  • त्या लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रिनवर तुम्हाला प्रोव्हिजिनल मेरीट लिस्ट पाहता येईल.
  • MHT CET Percentileच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिस्ट मध्ये त्यांचं नाव तपासता येईल.

MHT CET B.Tech च्या विद्यार्थ्यांना प्रवेशाकरता CAP प्रोव्हिजनल सीट मेट्रिक्सही जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ७ ते ९ जानेवारी दरम्यान आपला फॉर्म दाखल करता येणार आहे. तसेच CAP सीट अलॉटमेंट लिस्ट १३ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर CAP ची शेवटची मेरिट लिस्ट एमएचटी सीईटी काउंसलिंगच्या आधारावर जाहीर केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांची सरकारला चिंता, यंदा परेडचे पास फक्त दिल्लीकरांनाच


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -