घरताज्या घडामोडीCorona: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फोल!, WHOने सांगितलं 'असा' झाला कोरोना विषाणू...

Corona: डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फोल!, WHOने सांगितलं ‘असा’ झाला कोरोना विषाणू निर्माण

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत आहेत. कोरोना विषाणू हा चीनमधील वुहान शहरातील प्रयोग शाळेत तयार करण्यात आला. त्यानंतर एक अपघाताने हा विषाणू वातावरणात पसरला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसंच अमेरिका चीनमध्ये कोरोना विषाणूचा उगम कसा झाला? आणि मग जगभरात हा विषाणू कसा पसरला? याचा सखोल तपास करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

नैसर्गिकरित्या कोरोना विषाणू निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या चर्चेनंतर कोरोना विषाणू हा नैसर्गिकरित्या निर्माण झाल्याचं समोर आलं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक माइकल जे. रयाने म्हणाले.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं गेलं की त्यांनी अशाप्रकारे काही पाहिलं आहे का?, कोरोना विषाणूची सुरुवात चीनच्या वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधूनच झाली आहे. तर त्यावेळेस ट्रम्प म्हणाले, मी पाहिलं आहे. ते म्हणाले की, मला वाटतं जागतिक आरोग्य संघटनेला लाज वाटली पाहिजे कारण ते चीनसाठी एका पीआर एजेंसी सारखी आहे.

आतापर्यंत अमेरिकेत ११ लाख ३१ हजार ४९२ कोरोनाबधित रुग्ण आढळले आहे. त्यापैकी ६५ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ६१ हजार ५६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मजुरी, रेशन नसल्यामुळे संतापलेले १५०० मजूर उतरले रस्त्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -