घरताज्या घडामोडीमायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात, नेमकं कारण काय?

मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात, नेमकं कारण काय?

Subscribe

ट्विटर, अॅमेझॉन, मेटा आणि ओला या कंपन्यांनंतर आता मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीने नोकरकपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कंपनीत 5 टक्के कर्मचारी कपात करण्याची योजना तयार केली आहे. याचाच अर्थ मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या कपातीचा 11 हजार कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.

जगभरात मानव संसाधन आणि अभियांत्रिकी विभागांमध्ये हजारो नोकऱ्या कपातीची अपेक्षा आहे. ही नोकरकपात यूएस तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीनतम कपात असणार आहे. मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी कपातीचा प्रभाव अभियांत्रिकी विभागात होणार आहे.

- Advertisement -

नेमकं कारण काय?

मागील तीन महिन्यांपासून पर्सनल कॉम्प्युटर मार्केट घसरत आहे. त्यामुळे त्याचा फटका विंडोज आणि डिव्हाइसच्या विक्रीला बसला आहे. फटका बसल्यामुळे कंपनीवर आपल्या क्लाउड युनिट Azure मध्ये वाढीचा दर कायम ठेवण्याचा दबाव आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने त्यांच्या अनेक विभागांमध्ये जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आव्हानात्मक अर्थव्यवस्थेचा सामना करणारी मायक्रोसॉफ्ट ही नवीनतम मोठी टेक कंपनी आहे.

- Advertisement -

जुलैमध्येही मायक्रोसॉफ्टने काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. 30 जूनपर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये 2,21,000 पूर्णवेळ कर्मचारी होते, त्यापैकी 1,22,000 युनायटेड स्टेट्समध्ये कार्यरत होते. तर 99,000 आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी तंत्रज्ञान उद्योगासमोरील दोन वर्षांच्या आव्हानांचा इशारा दिल्यानंतर काही आठवड्यातच ही कपात करण्यात आली आहे.


हेही वाचा : धक्कादायक! दिल्लीत दोन विद्यार्थ्यांना भरधाव कारने चिरडले, एकाचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -